टी20 वर्ल्डकपसाठी ‘मॅच फिक्सर’ खेळाडूला पाकिस्तानची पसंती, कॅच सोडणारा प्लेयर बाहेर

| Updated on: May 24, 2024 | 9:53 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानने संघाने आपला संघ जाहीर केला आहे. बाबर आझमकडे संघांचं नेतृत्व असून मॅच फिक्सर खेळाडूला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहे. पाकिस्तानने मॅच फिक्सर खेळाडूपुढे लोटांगण का टाकलं असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी मॅच फिक्सर खेळाडूला पाकिस्तानची पसंती, कॅच सोडणारा प्लेयर बाहेर
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तानने सर्वात उशिरा आपला संघ जाहीर केला. संघ जाहीर करणारा पाकिस्तान हा 20वा संघ ठरला आहे. पाकिस्तानने संघ जाहीर करताच या संघात कोण आहे याची उत्सुकता लागून होती. कारण पाकिस्तानचा संघ भारताच्या गटात असून 9 जूनला हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. असताना मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या मोहम्मद आमिरची संघात निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ यांच्या 2010 मध्ये इंग्लंड दौऱ्यात बंदी घालण्यात आली होती. तिघं लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी होते. त्यानंतर तिघांवर क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. 2015 मध्ये आयसीसीने वेळेआधीच आमिरवरील बंदी हटवली होती. या वेगवान गोलंदाजावरील बंदी 2 सप्टेंबरला संपणार होता. मात्र आयसीसीने त्याच्यावरील बंदी मागे घेतली.

दुसरीकडे, पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज हसन अलीला स्थान मिळालेलं नाही. तसेच राखीव खेळाडू म्हणून एकालाही ठेवलेलं नाही. हसन अलीने आयर्लंडविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. त्यात त्याने सर्वात महागडा स्पेल टाकला होता. तर मागच्या वर्ल्डकपमध्ये झेल सोडल्याने विलन ठरला होता. अखेर पाकिस्तानने त्याचा काटा काढला आणि संघातून बाहेर फेकून दिलं. पाकिस्तानसाठी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयूब आणि उस्मान खान हे पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळणार आहेत.पाकिस्तान आपला पहिला सामना अमेरिकासोबत 6 जूनला खेळणार आहे. तर दुसरा सामना 9 जूनला भारतासोबत आहे.

पाकिस्तान टीम: बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान.

टी20 वर्ल्ड कप 2024 साठीचे गट:

ग्रुप ए- भारत, पाकिस्तान, आयरलँड, कनाडा, यूएसए
ग्रुप बी- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सी- न्यूजीलंड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी- साऊथ अफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, नेपाळ