बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज शुक्रवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये शादाब खान याच्या जागी उसामा मीर याला संधी दिली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात उतरली. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी याने बॉलिंगची सुरुवात केली. मात्र शाहीनने पहिल्याच बॉलवर माती खाल्ली. शाहिनने टाकलेला पहिला बॉल हा डेव्हिड वॉर्नर याच्या आधी बॅटला लागून पॅडला लागला. अफ्रिदीने जोरदार अपिल केली. मात्र अंपायरने नॉट आऊट दिलं.
पाकिस्तानने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान दिलं. शाहिनने कॅप्टन बाबर आझम आणि इतरांना रीव्हीव्यू घ्यायला भाग पाडलं. मात्र रिव्हीव्यू दरम्यान पुन्हा स्पष्ट झालं की बॉल पॅडला लागण्याआधी बॅटला लागलंय. पाकिस्तानने अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर रीव्हीव्यू वाया घालवत माती खाल्ली. शाहिनवर या फालतू रीव्हीव्यूवरुन सडकून टीका होत आहे. स्पष्टपणे बॅटला कट लागल्याचं दिसूनही शाहिनने रीव्हीव्यू का घेतला, त्याला समजत नाही का, असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
त्यानंतर उसामा मीर याने कच खाल्ली. उसामा याने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये शाहिन अफ्रिदीच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नर याचा लॉलीपॉप कॅच सोडला. डेव्हिडने पाचव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर मोठा फटका मारला. मात्र तो उंच गेला. उसामासाठी सोपा कॅच होता. मात्र उसामाने सोपा कॅच सोप्या पद्धतीने सोडला. वॉर्नरला 10 धावांवर जीवनदान मिळालं. आता पाकिस्तानला ही चूक किती महागात पडते हे लवकरच स्पष्ट होईल.
पाकिस्तानने काय केलं बघा
Only Vintage Pakis can review this on the very first ball of the match 🥵💥#AUSvsPAK pic.twitter.com/xAHFTbxORQ
— Radoo🌶️ (@Chandan_radoo) October 20, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.