WTC 2023-2025 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा भारतासह तीन संघांना दे धक्का, पाहा नेमकं काय केलं

| Updated on: Jul 27, 2023 | 6:27 PM

पाकिस्तानने कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करत इतिहास रचला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत असलेल्या दिग्गज संघांना मागे टाकलं आहे.

WTC 2023-2025 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा भारतासह तीन संघांना दे धक्का, पाहा नेमकं काय केलं
WTC 2023-2025 | श्रीलंकेला पराभूत करत पाकिस्तानचा विक्रम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दिग्गज संघांना टाकलं मागे
Follow us on

मुंबई : पाकिस्ताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा 2-0 ने पराभव केला आहे. श्रीलंकेने पाकिस्तानी गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना सर्वबाद 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने 576 धावांचा डोंगर रचला आणि 410 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी गाठताना श्रीलंकेची दमछाक झाली आणि संपूर्ण संघ 188 धावांवर बाद झाला. हा विजयासह पाकिस्तानने इतिहासाची नोंद केली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या शर्यतीत भारतासह दिग्गज संघांना मागे टाकलं आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेत नोंदवले तीन मोठे विक्रम

पाकिस्तानने विदेशात इतक्या मोठ्या फरकाने पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानने 200 हून अधिक धावांनी विजयाची नोंद केली. तसेच श्रीलंकेत सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा विक्रमही केला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेत पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत विदेशात 4 रन्स प्रति ओव्हरहन अधिक रेट्सने धावा केल्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप

पाकिस्तानने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पॉइंट पर्सेंटेज सिस्टममध्ये  विजयी टक्केवारी 100 इतकी आहे. तसेच पदरात दोन विजयांसह 24 गुण आले आहे. यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचं एक सामना ड्रॉ झाल्याने नुकसान झालं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. तर इंग्लंड चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे.

भारताच्या पदरात 16 गुण असून विजयी टक्केवारी 66.67 इतकी आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा सामना ड्रॉ झाल्याने भारताला फटका बसला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या पदरात 26 गुणांची कमाई असून विजयी टक्केवारी 54.17 इतकी आहे. इंग्लंडकडे 14 गुण असून विजयी टक्केवारी 29.17 इतकी आहे. तर वेस्ट इंडिजला 4 गुण मिळाले असून विजयी टक्केवारी 16.67 इतकी आहे. संघांचे गुण कितीही असले तरी विजयी टक्केवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये महत्त्वाची ठरते. पाकिस्तानचे गुण कमी असले तरी विजयी टक्केवारी इतर संघांपेक्षा जास्त आहे.

ॲसेस मालिकेनंतर गुणतालिकेत फरक पडणार

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु झाला आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तर एक सामना पावसामुळे स्थगित झाला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येईल. कारण या कसोटी मालिकेनंतर पाच महिने तरी कोणतीच कसोटी नाही.