पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीन ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडले आहे. जास्तीत जास्त पाकिस्तानच्या खेळाडूंना त्याने संघात स्थान दिलं आहे. पाकिस्तानच्या पाच खेळाडूंना स्थान मिळालं आहे. यात इंझमाम उल हक, सईद अन्वर, रशीद लतीफ, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांचं नाव आहे. इंझमाम उल हकला ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार जाहीर केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू संघात आहेत. यात एडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, ग्लेन मॅक्ग्रा आणि शेन वॉर्नला स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे संघात एडम गिलख्रिस्ट असताना विकेटकीपर म्हणून रशीद लतीफला स्थान दिलं आहे. रशीद लतीफचा रेकॉर्ड हा इतर विकेटकीपरच्या तुलनेत तितका चांगला नाही. तरीही रशीद लतीफला संघात स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताकडून एकमेव दिग्गज खेळाडू असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान मिळालं आहे. तसेच विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूंना डावललं आहे. तसेच शाहिद आफ्रिदी स्वत: देखील या संघात नाही.
पाकिस्तानचा माजी क्रिकेट सईद अन्वर आणि एडम गिलख्रिस्ट ओपनिंगला येतील. यापैकी एक खेळाडू बाद झाला की रिकी पाँटिंग बाजू सावरेल. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चौथ्या स्थानावर मान मिळेल. पाचव्या स्थानावर इंझमाम उल हक उतरेल. सहाव्या क्रमांकासाठी अष्टपैलू जॅक कॅलिसला संधी दिली आहे. सातव्या क्रमांकावर विकेटकीपर बॅट्समन म्हमून रशीद लतीफ उतरेल. वेगवान गोलंदाजीची धुरा वसीम अक्रम, शोएब अख्तर, ग्लेन मॅक्ग्राच्या खांद्यावर असेल. तर फिरकीची जबाबदारी शेन वॉर्न सांभाळेल.
शाहिद आफ्रिदीची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन : सईद अन्वर (पाकिस्तान), एडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), इंझमाम उल हक (कर्णधार/पाकिस्तान), जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रिका), रशीद लतीफ (विकेटकीपर/पाकिस्तान), वसीम अक्रम (पाकिस्तान), ग्लेन मॅक्ग्रा (पाकिस्तान), शोएब अख्तर (पाकिस्तान), शेन वॉरन (ऑस्ट्रेलिया).