पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून PM मोदींचा राम मंदिरातील फोटो शेअर, म्हणाला…

| Updated on: Jan 22, 2024 | 6:31 PM

राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पाकिस्तानमधील खेळाडूने मोदींचा फोटो शेअर करत जय श्रीराम लिहिलं आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून PM मोदींचा राम मंदिरातील फोटो शेअर, म्हणाला...
Pakistrani Cricketer post Ram Mandir Photo
Follow us on

मुंबई : राम मंदिरातील प्रभू राम चंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. रामलल्ला भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाजाच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक विधी पार पडला. देशभरात रामलल्लाच्या स्वागताची तयारी सुरू होती. रामभक्तांनीही मोठ्या थाटामाटात हा सोहळा साजरा केला आहे. राम मंदिराच्या सोहळ्याची चर्चा देशातच नाहीतर परदेशातही आहेत. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्येही सोहळ्याची चर्चा आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूने थेट पीएम मोदींचा फोटो शेअर केला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडला. मोदींना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. अयोध्येमधील मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाल्यावर या खेळाडूने पोस्ट केली आहे. या खेळाडूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही पोस्ट केला आहे. कोण आहे हा खेळाडू?  हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कट्टर हिंदू म्हणून ओळखला जाणारा दानिश कनेरिया आहे.

 

शतकानुशतकांची प्रतीक्षा संपली, प्रतिज्ञा आणि प्राणप्रतिष्ठाही पूर्ण झाली,  दानेश कनेरिया याने ट्विट  करत म्हटलं आहे. त्यानंतर ट्विट रिपोस्ट करत जय श्रीराम असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दानेश कनेरियाने याआधीही राम मंदिराच्या संदर्भात पोस्ट केल्या आहेत. इतकंच नाहीतर त्याने स्वत:च भगवा ध्वज घेतलेला फोटोही काही दिवसांमागे पोस्ट केला होता.

दानिश कनेरिया हा हिंदू असून त्याने पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले आहेत. निवृत्तीनंतर दानिश याने अनेकवेळा गंभीर आरोप केले होते. पाकिस्तान संघातील खेळाडू त्याला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचं त्याने म्हटलं होतं.