मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील 10 व्या सामन्या सराव सामन्यामध्ये कांगारूंनी 14 विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 50 ओव्हरमध्ये 351-7 धावा केल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रलियाने 350 धावांचा टप्पा पार केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 337 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांना ओगळता सर्व खेळाडूंनी 30पेक्षा अधिक धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर 48 धावा, लाबुशेन 40 धावा, ग्लेन मॅक्सवेल 77 धावा, कॅमेरून ग्रीन 50 धावा, जोश इंग्लिस 48 धावा यांनी दमकार बॅटींग करत पाकिस्तानच्या गोलंदाजीतील हवा काढत संघाला 351 धावांचं लक्ष्या गाठून दिलं होतं. पाकिस्तानकडून उसामा मीर यानेच सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्यासोबतच इतर गोलंदाजांनी एक-एक विकेट घेतली.
पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या 83 धावांत 4 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर इफ्तिखार अहमद 83 धावा आणि बाबर आझम 90 धावा करत डाव सावरला होता. मात्र इफ्तिखार अहमद आऊट झाला आणि काही वेळात बाबर रिटायर हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर सर्व सामनाच फिरला, कांगारूंनी ऑल आऊट करत सामना खिशात घातला.
पाकिस्तान संघ : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद हॅरिस (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, फखर जमान, मोहम्मद नवाज, शादाब खान (C), उसामा मीर , मोहम्मद रिझवान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर
ऑस्ट्रेलिया संघ ): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन , मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, ट्रॅव्हिस हेड, अॅडम झम्पा