मुंबई : आशिया कप 2023 सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 42 ओव्हरमध्ये 252 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 8 विकेट्स गमावून शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. सामन्यात पावसाच्या एन्ट्रीमुळे 50 ऐवजी 42 ओव्हरचा खेळ झाला. श्रीलंका आता अंतिम सामन्यात ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.
श्रीलंकेचा थरारक विजय
https://twitter.com/ICC/status/1702406954528719335
कोलंबो | श्रीलंका क्रिकेट टीमने आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात पोहचणारी टीम ठरली आहे. तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 42 ओव्हरमध्ये 252 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 8 विकेट्स गमावून शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. त्यामुळे आता रविवारी 17 सप्टेंबर रोजी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका असा महाअंतिम सामना होणार आहे.
कोलंबो | पाकिस्तानच्या शाहीन शाह अफ्रीदी याने श्रीलंकेला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. शाहीनने 41 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आधी धनंजया डी सिल्वा आणि पाचव्या बॉलवर दुनिथ वेल्लालागे आऊट आऊट झाला. त्यामुळे लंकेची 40.5 ओव्हरमध्ये 243-7 अशी स्थिती झाली.
कोलंबो | श्रीलंकेने पाचवी आणि मोठी विकेट गमावली आहे. कॅप्टन दासून शनाका 2 धावांवर कॅच आऊट झालाय.
कोलंबो | कुसल मेंडीस नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला आहे. मोहम्मद हरीस याने अफलातून कॅच घेत कुसल मेंडीस याला 91 धावांवर आऊट केलं.
कोलंबो | सदीरा समरविक्रमा याच्या रुपात श्रीलंकेने तिसरी विकेट गमावली आहे. सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडीस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर इफ्तिखार अहमद याने ही सेट जोडी फोडली. इफ्तिखारने समरविक्रमा याला 48 धावांवर आऊट केलं.
कोलंबो | कुसल मेंडीस याने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. श्रीलंकेचा 21 ओव्हरमध्ये 2 बाद 132 असा स्कोअर झाला आहे.
कोलंबो | श्रीलंकेला दुसरा झटका लागला आहे. पाथुम निसांका 29 धावा करुन माघारी परतला.
कोलंबो | श्रीलंकेला पहिला धक्का लागला आहे. कुसल परेरा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. कुसल परेरा 17 धावांवर बाद झाला.
कोलंबो | श्रीलंकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पाथुम निसांका कुसल परेरा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांंचं आव्हान आहे.
पाकिस्ताननं 42 षटकात 7 गडी गमवून 252 धावा केल्या आहेत. श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान श्रीलंका गाठते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोलंबो | पाकिस्तानने सहावी विकेट गमावली आहे. इफ्तिखार अहमद 40 बॉलमध्ये 47 धावांची निर्णायक खेळी करुन आऊट झाला.
कोलंबो | पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान याने निर्णायक क्षणी झुंजार अर्धशतक ठोकत पाकिस्तानचा डाव सावरला आहे.
कोलंबो | पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आहे. मात्र आता आणखी 3 ओव्हर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता 45 ऐवजी 42 ओव्हरचा गेम होणार आहे.
पावसामुळे 42 ओव्हरचा खेळ
🚨 Play will resume at 8:10 pm local time as the game has been reduced to 42-overs-a-side 🏏#PAKvSL | #AsiaCup2023 pic.twitter.com/0HZqNyW7da
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 14, 2023
कोलंबो | पाकिस्तान-श्रीलंका सामना पावसामुळे दुसऱ्यांदा थांबला आहे. पावसामुळे काही वेळ वाया गेल्याने आता पुन्हा काही ओव्हर कमी होण्याची शक्यता आहे.
जा रे जा रे पावसा
The covers are on as play has been stopped due to rain 🌧️#PAKvSL | #AsiaCup2023 pic.twitter.com/VmaGDAWBWQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 14, 2023
कोलंबो | आधीच विलंबाने सुरु झालेला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात पुन्हा पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे खेळ थांबला आहे. पाऊस येण्याआधी पाकिस्तानने 27.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 130 धावा केल्या आहेत.
कोलंबो | श्रीलंकेने पाकिस्तानला पाचवा झटका दिला आहे. मोहम्मद नवाज 12 धावा करुन आऊट झालाय.
पाथिरानाच्या गोलंदाजीवर मोहम्मद हारिस बाद झाला. पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे.
अब्दुल्लाह शफिक अर्धशतकी खेळून तंबूत परतला आहे. मथीशा पथिरानाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
शफिकने 65 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल त्याची अंतिम फेरीत वर्णी लागेल.
बाबर आझम 29 धावा करून तंबूत परतला आहे. दुनिथ वेल्लालागेच्या गोलंदाजीवर फटका मारताना चेंडू हुकला आणि स्टंपिंग झाला.
बाबर आझम आणि अब्दुल्लाह शफीक यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली.
पाकिस्तानचा फखर झमान अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला आहे. प्रमोद मधुशानने त्याचा त्रिफळा उडवला.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना
🚨 T O S S A L E R T 🚨
Pakistan win the toss and elect to bat first. The match has been reduced to 45 overs per side 🏏#PAKvSL | #AsiaCup2023 pic.twitter.com/dvinfuBN0F
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 14, 2023
अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना उशिराने सुरु होणार आहे. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल होणार आहे. तसेच 5.15 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना 45 षटकांचा असणार आहे.
Toss at 05:00PM
First ball at 5:15PM45 overs per-side match#SLvPAK #AsiaCup2023 pic.twitter.com/0tyDKKNUpU
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 14, 2023
कोलंबोमध्ये अजूनही पाऊस काही थांबायचं नाव नाही घेते, त्यामुळे जर सामना रद्द झाला तर श्रीलंका संघाचा फायनलमधील तिकिट निश्तित आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यात पावसाने एन्ट्री केली आहे. त्यामुळे टॉसला उशिर झाला आहे. हा सामना होतो की नाही हेसुद्धा काही सांगता येणार नाही. कारण कोलंबोलमधील वातावरण ढगाळ असलेलं पाहायला मिळालं आहे.