चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 23 ऑक्टोबर रोजी आशियातील 2 शेजारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. पाकिस्तानच्या बाजून नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन बाबर आझम याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. दोन्ही टीममध्ये प्रत्येकी 1-1 बदल करण्यात आला आहे. अफगाणिस्तानने फझलहक फारुकीला प्लेईंग ईलेव्हनमधून डच्चू दिला आहे. तर त्याच्या जागी नूर अहमद याला संधी दिली आहे. नूर अहमद आल्याने अफगाणिस्तानचं स्पिन डिपार्टमेंटला आणखी ताकद मिळाली आहे. तर पाकिस्तानने ऑलराउंडर शादाब खान याला संधी दिली आहे. मोहम्मद नवाझ याची प्रकृती स्थित नसल्याने शादाब खान याचं टीममध्ये कमबॅक झालं आहे.
एकदिवसीय क्रिकेट इतिहासाता आतापर्यंत पाकिस्तान अफगाणिस्तानवर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुद्ध एकतर्फी वर्चस्व गाजवलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात एकूण 7 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या 7 पैकी 7 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानला एकदाही यश मिळालेलं नाही. मात्र अफगाणिस्तानचा उलटफेर करण्यात कुणीही हात धरु शकत नाही. त्यामुळे अफगाणिस्तान हा सामना जिंकून पाकिस्तान विरुद्ध विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न करणार आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकला
🚨 NEWS FROM THE CENTER 🚨
Pakistan won the toss and opted to bat first. 👍#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/17wqHGdhbS
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 23, 2023
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली आणि हरिस रौफ.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमातुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि नूर अहमद.