मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. खेळाडूने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट टीमची कॅप्टन बिस्माह मारुफने कर्णधारपद सोडलं आहे. बिस्माह पाकिस्तानची महत्वाची खेळाडू आहे. बिस्माह ऑलराउंडर खेळाडू आहे. बिस्माहने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय केला आहे. बिस्माहने याबाबती माहिती ट्विट करत दिली आहे.
“मी पाकिस्तान वूमन्स टीमचं नेतृत्व केलंय, यापेक्षा माझ्यासाठी गर्व आणि अभिमानाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. पाकिस्तानला नवीन आणि युवा कर्णधार मिळण्याची योग्य वेळ आली आहे. मी कायम मार्गदर्शनासाठी टीमसोबत असेन”, असं ट्विट बिस्माहने केलंय.
पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बिस्माहचा राजीनामा मंजूर केली आहे. याबाबतची माहिती पीसीबीचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतरही बिस्माह टीमचा भाग असणार आहे. मात्र आता बिस्माहने राजीनामा दिल्याने आता कर्णधारपदी कोणची वर्णी लागते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
नुकताच महिला टी 20 वर्ल्ड कप पार पडला. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी राहिली. पाकिस्तानचा साखळी फेरीतील 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव झाला. पाकिस्तानने साखळी फेरीतील एकमेव विजय हा आयर्लंड विरुद्ध मिळवला.
बिस्माहने या वर्ल्ड कपमधील 3 सामन्यात 98 धावा केल्या. बिस्माहने आतापर्यंत 124 वनडे सामन्यांमध्ये 18 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 110 धावा केल्या आहेत. तर 132 टी 20 सामन्यांमध्ये 2 हजार 658 रन्स केल्या आहेत. यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे.