मुंबई : आशिया कप 2023 मधील आज तिसरा हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. (IND VS PAK ASIA CUP 2023) या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींंचं लक्ष लागलेलं आहे. वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये 2019 नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तान संघाने सामन्याच्या 19 तास आधी आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. आजच्या सामन्यात (CAPTAIN ROHIT SHARMA) रोहित शर्मा आणि टीम व्यवस्थापनासमोर प्लइंग 11 जाहीर करताना मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. मिडल ऑर्डरमध्ये दोन मुंबईकर खेळडूंपैकी एकालाच संघात स्थान देण्यात येणार आहे.
टीम इंडियाकडून ओपनिंगला रोहित शर्मासोबत शुबमन गिल, त्यानंतर विराट कोहली हे खेळाडू फिक्स असतील पण त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये मिस्टर 360 प्लेअर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये कोणाला संधी द्यायची हा मोठा निर्णय रोहित शर्मासह टीम मॅनेजमेंटला घ्यावा लागणार आहे. के. एल. राहुल सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नसल्याने ईशान किशन कीपर म्हणून फिक्स असणार त्यामुळे रोहित शर्मा मोठ्या धर्मसंकटात सापडला असावा.
सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी श्रेयसचं पारडं जड मानलं जात आहे. कारणस वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये सूर्याची बॅट अजूनही म्हणावी अशी चालताना दिसली नाही. तर श्रेयस दुखापतीतून कमबॅक करत असून त्याची मिडल ऑर्डरमध्ये आकडेवारी चांगली आहे. मात्र अनेक दिवसांनी तो मैदानावर येणार असल्याने व्यवस्थापन कोणता तरी एक निर्णय घेईल.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.
भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन