मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा केन विलियमसनच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध (GT vs SRH) सामना झाला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) काल हरलेला सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला राशिद खान. (Rashid Khan) सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. राहुल तेवतिया आणि राशिद खानची जोडी मैदानात होती. मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरातला एक थरारक विजय मिळवून दिला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात चार सिक्स होते. राहुल तेवतिया (Rahul Tewtia) 21 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेटने विजय मिळवला. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये ऑरेंज कॅपच्या टेबलमधील सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या पाच खेळाडुंवर नजर टाकुया. ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्य्ये पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 499 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 368 धावा या सीजनमध्ये केल्या आहेत. कालच्या गुजरातविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनला धक्का देत हार्दिक पांड्या आला आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 305 धावा काढल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर शिखर धवन गेला असून त्याने आतापर्यंत 302 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर अभिषेक शर्माने डु प्लेसिसला धक्का देत आपलं स्थान पक्क केलं आहे. त्याच्या धावा 285 झाल्या आहेत.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
मोक्याच्याक्षणी राहुल आणि राशिदने आपली बॅट चालवली. दोघांनी या ओव्हरमध्ये चार सिक्स मारुन गुजरातला स्पर्धेतील सर्वात रोमांचक विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. राशिद खान स्ट्राइकवर होता. त्याने थेट सिक्स मारुन मॅचच संपवली.