मोहाली | आयपीएल 16 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दोन्ही संघांची या हंगामात समोरासमोर येण्याची ही दुसरी वेळ होती. या सामन्याचं आयोजन हे मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. पंजाब किंग्सने 15 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 2 विकेट्सने मात केली होती.त्यामुळे आता या सामन्यात पंजाब पुन्हा मात करणार, की लखनऊ आपल्या होम ग्राउंडवरील पराभवाचा वचपा घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र लखनऊने पंजाबवर 56 धावांनी मात करत मागील पराभवाचा वचपा घेतला.
लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर 56 धावांनी विजय मिळवला. लखनऊचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. लखनऊने पहिले बॅटिंग करताना पंजाबला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 201 धावाच करता आल्या.
पंजाबने नववी विकेट गमावली आहे. कगिसो रबाडा भोपळा न फोडता आऊट झाला आहे.
पंजाबने पाचवी विकेट गमावलीआहे. लियाम लिविंगस्टोन 23 धावांवर बाद झाला.
पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे. सिंकदर रजा 22 बॉलमध्ये 36 रन्स करुन आऊट झाला.
पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. शिखर धवन याच्यानंतर प्रभासिमरन सिंह 9 धावा करुन माघारी परतला.
पंजाब किंग्सला मोठा झटका लागला आहे. शिखर धवन आऊट झाला आहे. धवन 1 धावा करुन माघारी परतला.
पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभासिमरन सिंह आणि शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. पंजाबसमोर विजयासाठी 258 धावांचं आव्हान आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. लखनऊच्या सर्वच फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च दुसरी धावसंख्या ठरली. लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस याने 40 चेंडूत सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. कायले मेयर्स याने 24 बॉलमध्ये 54 रन्सचं योगदान दिलं. निकोलस पूरन याने 45 धावा केल्या. आयुष बदोनी 43 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन केएल राहुल 12 धावांवर आऊट झाला. दीपक हुड्डा याने नाबाद 11 आणि कृणाल पंड्याने 5* धावा केल्या. तर पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. सॅम करण, अर्शदीप सिंह आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लखनऊ सुपर जांयट्सने 200 धावा पूर्ण केल्या आहेत. लखनऊच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली.
लखनऊने तिसरी विकेट गमावली आहे. आयुष बदोनी 24 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 चौकरांच्या मदतीने 43 धावा केल्या.
लखनऊने दुसरी विकेट गमावली आहे. कगिसो रबाडा याने डोकेदुखी ठरत असलेल्या कायले मेयर्स याला कॅप्टन शिखर धवनच्या हाती कॅच आऊट केलं. मेयर्सने 24 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली.
लखनऊ सुपर जायंट्सचा सलामी फलंदाज कायले मेयर्स याने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
आश्वासक आणि वेगवान सुरुवातीनंतर लखनऊला पहिला झटका लागला आहे. पंजाबच्या कगिसो रबाडा याने लखनऊ कॅप्टन केएल राहुल याला 12 धावांवर आऊट केलंय.
लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स ही सलामी जोडी मैदानात आहे. पंजाबने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपर हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.
पंजाब किंग्स टीमने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या या सामन्यातही पुन्हा एकदा टॉस जिंकला आहे. कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ या मोसमात एकूण दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधीच्या सामन्यात पंजाबने लखनऊवर विजय मिळवला होता. आता या सामन्यात कोण विजेता होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.