Asian Games 2023 | एशियन गेम्स 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ जाहीर, कॅप्टन कोण?

| Updated on: Aug 24, 2023 | 11:06 PM

Pakistan Cricket Board | बीसीसीआयनंतर पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही दिवसांआधी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे.

Asian Games 2023 | एशियन गेम्स 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ जाहीर, कॅप्टन कोण?
Follow us on

इस्लामाबाद | आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील एकूण 13 सामने हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत पार पडणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या सहा संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. त्यानंतर एशियन गेम्स 2023 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या एशियन गेम्स स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आलं आहे. एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेट सामने ही खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा पार पडणार आहे.

या एशियन गेम्ससाठी बीसीसीआयने 14 जुलै रोजी टीम इंडियाची घोषणा केली. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. पीसीबीने एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. कासिम अक्रम याच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ओमेर बिन युसूफ उपकर्णधार असणार आहे.

हे सुद्धा वाचा

कासिम अकरम याने गेल्या वर्षी अंडर 19 टीमचं कर्णधारपद सांभाळलं होतं. त्यामुळे आता कासिमकडे एशियन गेम्समध्ये धमाकेदार कामगिरी करुन नॅशनल टीममध्ये एन्ट्री मिळवण्याची संधी आहे.अकरमने डोमेस्टिर क्रिकेटमध्ये 20 फर्स्ट क्लास, 45 लिस्ट ए आणि 40 टी 20 सामने खेळले आहेत.

दरम्यान आयसीसी रँकिंग टॉप 10 मध्ये असल्याने टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट टीमला थेट क्वार्टर फायनलमध्ये संधी मिळाली आहे. क्वार्टर फायनलमधील सामने 3 आणि 4 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहेत. तर 6 ऑक्टोबरला सेमी फायनल होणार आहे. तर 7 ऑक्टोबरला महाअंतिम सामना पार पडेल.

एशियन गेम्ससाठी पाकिस्तान क्रिकेट टीम

एशियन गेम्ससाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | कासिम अक्रम (कॅप्टन), ओमेर बिन युसूफ (उपकर्णधार), आमिर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज दहनी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादिर.

राखीव खेळाडू | अब्दुल वाहिद बंगालझाई, मेहरान मुमताज, मोहम्मद इम्रान जूनियर, मुहम्मद इरफान खान नियाझी आणि मुबासिर खान.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.