Cricket : पाकिस्तान, इंग्लंडनंतर आता श्रीलंकेचा नंबर, टीम इंडिया तिसऱ्या विजयासाठी सज्ज

| Updated on: Jan 14, 2025 | 9:52 PM

PD Champions Trophy 2025 : दिव्यांग टीम इंडियाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग 2 सामने जिंकत धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पाकिस्ताननंतर इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर आता 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध तिसरा सामना होणार आहे.

Cricket : पाकिस्तान, इंग्लंडनंतर आता श्रीलंकेचा नंबर, टीम इंडिया तिसऱ्या विजयासाठी सज्ज
Differently Abled Indian cricket team
Image Credit source: dcciofficial x account
Follow us on

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात केलीय. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृ्त्वात विजयी सलामी दिली. टीम इंडियाने 12 जानेवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने पाकिस्तावर 109 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाने इंग्लंडवर 29 धावांनी मात केली. टीम इंडियाने यासह सलग दुसरा विजय प्राप्त केला. त्यानंतर आता विक्रांतसेना तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

टीम इंडिया या स्पर्धेतील तिसरा सामना हा बुधवारी 15 जानेवारी रोजी खेळणार आहे. श्रीलंकेसमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला यजमान श्रीलंका मैदानात असणार आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी अनुकूल परिस्थितीत असणार आहे. त्यामुळे बुधवारी दोन्ही संघात चांगलीच चुरुस पाहायला मिळणार आहे.

विजयी हॅटट्रिकची संधी

भारताने सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक करण्याची संधी आहे. आता टीम इंडिया हॅटट्रिक करण्यात यशस्वी ठरते की यजमान श्रीलंका रोखते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना बुधवारी 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना बीओआय ग्राउंड, कटुनायके येथे होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार 1 वाजता सुरुवात होईल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह सामना फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र