आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 5 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना होणार आहे. हा सामना अहमबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीत गुजरात टायटन्सला पहिले बॅटिंग करुन मुंबई इंडियन्ससमोर विजयी धावांचं आव्हान द्यावं लागणार आहे.
सूर्यकुमार यादव हा अजूनही अनफीट आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पलटणसाठी हा मोठा फटका आहे. तसेच सूर्या नसल्याने पलटणच्या चाहत्यांमध्ये निराशा आहे. तर या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी 3 परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी आणि ल्यूक वूड या 3 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर स्पेंसर जॉन्सन, डेव्हिड मिलर आणि अझमतुल्लाह झझाई हे विदेशी खेळाडू गुजरात टायटन्सच्या टीममध्ये आहेत.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला
Captains 🤝
Match 5️⃣ underway 🔜
Follow the match ▶️ https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/h41lQxHYqn
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
Looking good in blue-and-gold, go well tonight in the blue-and-gold! 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #GTvMI pic.twitter.com/dqQI9Dnwid
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2024
दरम्यान मुंबई इंडियन्सच्या या 17 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यातून एकूण 4 खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. मुंबईकडून
शम्स मुलानी, नमन धीर, लुक वूड आणि गेराल्ड कोएत्झी या चौकडीने पदार्पण केलं आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर या चौघांचे फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.