कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध ईडन गार्डन या घरच्या मैदानात 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने केकेआरला विजयासाठी 154 धावांचं आव्हान मिळालं. होतं. केकेआरने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरने 16.4 ओव्हरमध्ये 157 धावा केल्या. केकेआरचा दिल्ली विरुद्ध या हंगामातील दुसरा विजय ठरला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या दिशने एक पाऊल पुढे टाकलंय.
कोलकाताकडून ओपनर फिलीप सॉल्ट याने सर्वाधिक धावा केल्या. सॉल्टने 33 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 चौकारांच्या
मदतीने 68 धावांची खेळी केली. सुनील नरीन आणि रिंकू सिंह या दोघांनी अनुक्रमे 15 आणि 11 धावा जोडल्या. तर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी केकेआरला विजयापर्यंत पोहचवलं. श्रेयसने 23 बॉलमध्ये नाबाद 33 धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने 23 बॉलमध्ये 26 धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर लिझाड विलियम्सच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सला खास काही करता आलं नाही. मात्र कुलदीप यादवने अखेरच्या क्षणी केलेल्या 35 धावांच्या खेळीमुळे दिल्लीला 150 पार मजल मारता आली. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि ऋषभ पंत या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. कुलदीपने 35 आणि ऋषभने 27 धावा केल्या. तर अभिषेक पोरेल 18, अक्षर पटेल 15, पृथ्वी शॉ 13 आणि जॅक फ्रेसर मॅकग्रुक याने 12 धावांचं योगदान दिलं. तर दिल्लीकडून इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्थी याने कोलकातासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा आणि हर्षित राणा या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर सुनील नरीन आणि मिचेल स्टार्क या दोघांनी दिल्लीच्या 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स आणि खलील अहमद.