Rishabh Pant : पैसा, आयपीएल की देश? सर्वात महत्त्वाचं काय? ऋषभ पंत म्हणाला….

| Updated on: Jan 16, 2025 | 4:58 PM

Rishabh Pant : देश, आयपीएल की पैसा? ऋषभ पंतसाठी सर्वात महत्त्वाचं काय? भारतीय विकेटकीपरने काय उत्तर दिलं? जाणून घ्या.

Rishabh Pant : पैसा, आयपीएल की देश? सर्वात महत्त्वाचं काय? ऋषभ पंत म्हणाला....
rishabh pant team india
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत 1-3 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाला तब्बल 10 वर्षांनंतर प्रतिष्ठेची बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका गमवावी लागली. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रिकाम्या हाती परतावं लागलं. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेनमध्ये अविस्मरणीय खेळी करत टीम इंडियाला मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र यंदा पंतला तसं काही करता आलं नाही. टीम इंडिया आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्याआधी

पंतने काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली. पंतने या दरम्यान पैसा, आयपीएल आणि देश या पैकी तो कशाला प्राधान्य देतो? याबाबत क्रिकेटरने सांगितलं.

पंतने काय उत्तर दिलं?

पंतने गुरुवारी 16 जानेवारी रोजी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन संवाद साधला. पंत या प्रश्न-उत्तराच्या सत्रात दिलखुलासपणे व्यक्त झाला. चाहत्यांनी पंतला आपल्या मनातील प्रश्नं विचारले. “देश, आयपीएल की पैसा, तु कशाला प्राधान्य देतो?”, असा प्रश्न चाहत्याने पंतला विचारला. पंतने या प्रश्नावर मन जिंकणारं उत्तर दिलं. “फक्त चांगलं क्रिकेट खेळणँ आणि टीमला जिंकवणं”, असं उत्तर पंतने दिलं.

कठीण प्रश्नावर पंतचा ‘स्ट्रेट ड्राईव्ह’

दरम्यान क्रिकेट चाहत्यांनी पंतला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले. मात्र पंतने तितक्याच हुशारीने या प्रश्नांची उत्तरं दिली. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, विराटचा कव्हर ड्राईव्ह की रोहितचा पूल शॉट? यापैकी कोणता शॉट आवडतो? पंतने या 3 पैकी कोणताही एक पर्याय निवडला नाही. पंतने हे तिन्ही शॉट आवडतात, असं सांगितलं.

पंतची प्रश्नांवर जोरदार फटकेबाजी

दरम्यान पंतची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. इंग्लंडविरुद्ध टी 20i नंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणं बाकी आहे. आता या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धेत पंतला संधी मिळते का? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.