विश्व विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी 4 जुलै रोजी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया काही तासांच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यानंतर टीम इंडिया मुंबईच्या दिशेने निघाली. मुंबईत टीम इंडियाच्या खेळाडूंची ओपन डेकबसमधून नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडिममध्ये पुढील कार्यक्रम पार पडला. मुंबई क्रिकेट चाहत्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी तुफान गर्दी केली होती. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे हा सर्व कार्यक्रम चोखपणे पार पडला. मात्र यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोणत्या विषयावर बोलणं झालं? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर सर्व काही स्पष्ट झालंय. मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह काय चर्चा केली, हे जाणून घेऊयात.
पंतप्रधान-टीम इंडियाचा संवाद
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह वन टू वन संवाद साधला. पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक चौकशी केली. तसेच वर्ल्ड कप फायनल सामन्यात त्या क्षणी काय काय झालं? त्या क्षणी तुमच्या डोक्यात काय सुरु होतं? असं सर्वकाही मोदींनी विचारलं. यावर प्रत्येक खेळाडूंनी आपली भावना व्यक्त केली.
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.