टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून एडलेड ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना असणार आहे. त्याआधी 1 डिसेंबरला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात कॅनबेरा येथे सराव सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पीएम इलेव्हनला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पीएम ईलेव्हनला झटपट 2 झटके दिले. मोहम्मद सिराज याने मॅच रेनशॉ याला 5 धावांवर आऊट करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर आकाश दीप याने जेडन गुडविन याला 4 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर टीम इंडियाला विकेटसाठी बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली. पीएम इलेव्हनची 22 बाद 2 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर सॅम कोन्स्टास आणि जॅक क्लेटन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. त्यावेळेस हर्षित राणा आला आणि सामनाच फिरवला. हर्षित राणा याने ही जोडीच फोडली नाही तर 6 चेंडूत 4 विकेट्स घेत पीएम इलेव्हनला मागे टाकत विकेट्सची रांग लावली.
हर्षितने त्याच्या 2 षटकांमधील 6 चेंडूमध्ये एकूण 4 विकेट्स घेतले. हर्षितने पहिल्या डावातील 23 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि सहाव्या बॉलवर विकेट घेतली. हर्षितने जॅक क्लेटन याला 40 धावांवर बोल्ड करत टीम इंडियसााठी डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडली. त्यानंतर 1 बॉलच्या अंतराने ओलीव्हर डेव्हीस याला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर हर्षितने डावातील 25 व्या ओव्हरमधील पहिल्या आणि तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली. हर्षितने या ओव्हरमध्ये कॅप्टन जॅक एडवर्ड्स आणि सॅम हार्पर या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एडवर्ड्सने 1 धाव केली. तर सॅमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे पीएम ईलेव्हनची 131-2 वरुन 133-6 अशी स्थिती झाली.
राणाचा दणका, 6 बॉलमध्ये 4 विकेट्स
𝐑𝐀𝐍𝐀 𝐉𝐈 𝐎𝐍 𝐅𝐈𝐑𝐄 🔥
Double blow by #HarshitRana, dismisses a settled Clayton and follows up with Davies, rattling Australia’s batting order in the #PinkBallTest 🤯#AUSvINDonStar Warm-up match 👉 LIVE NOW on Star Sports! #ToughestRivalry pic.twitter.com/t7DkGfLPja
— Star Sports (@StarSportsIndia) December 1, 2024
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर प्लेइंग ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.