“राजकारणी बापाने माझं कर्णधारपद काढलं”, रणजी ट्रॉफीतील पराभवानंतर हनुमा विहारीने सर्वकाही केलं उघड

| Updated on: Feb 26, 2024 | 4:18 PM

हनुमा विहारीने रणजी ट्रॉफी दरम्यान आंध्र प्रदेश क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडण्याबाबत खरं काय ते सांगून टाकलं आहे. राजकारणाचा बळी पडल्याचा थेट आरोप क्रिकेटपटू हनुमा विहारी याने केला आहे. एका खेळाडूवर ओरडल्याने ही वेळ आल्याचं त्याने आपल्या आरोपामध्ये सांगितलं आहे.

राजकारणी बापाने माझं कर्णधारपद काढलं, रणजी ट्रॉफीतील पराभवानंतर हनुमा विहारीने सर्वकाही केलं उघड
Ranji Trophy : "मी त्याला ओरडलो म्हणून राजकारणी बापाने राग काढला", हनुमा विहारीने पराभवानंतर मांडलं दु:ख
Follow us on

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतून आंध्रप्रदेश संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेश संघाने आंध्रप्रदेशला अवघ्या 4 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे अष्टपैलू हनुमा विहारी याचं दु:ख बाहेर पडलं आहे. या स्पर्धेत घडलेल्या घडामोडींकडे त्याने लक्ष वेधून घेतलं. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्याला कर्णधारपद गमवावं लागलं होतं. त्याचं कारणंच तेव्हा त्याला कळलं नव्हतं. पण नंतर त्याला कळलं आपला गेम कसा झाला आहे. त्यामुळे हनुमा विहारी गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. अखेर उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर हनुमा विहारी व्यक्त झाला आहे. हनुमाने सांगितलं की, ‘एका खेळाडूवर ओरडल्याने कर्णधारपद गमवावं लागलं. कारण त्याचे वडील राजकारणी आहे.’ त्यानंतर त्याच्या ऐवजी संघाचं कर्णधारपद रिकी भुई याच्याकडे सोपवण्यात आलं.

“आम्ही शेवटपर्यंत संघर्ष केला पण तसं होणं ठरलेलं नव्हतं. आंध्रसोबत एक अजून उपांत्यपूर्व गमवल्याने निराश आहे. ही पोस्ट काही तथ्य मांडणारी आहे आणि तुमच्यासमोर ठेवतो. मी बंगालविरुद्ध पहिल्या सामन्यात कर्णधार होतो. या सामन्यात मी 17व्या खेळाडूवर रागवलो. त्यानंतर त्याने याची तक्रार वडीलांकडे (ते एक राजकारणी आहेत) केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी एसोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितलं. आम्ही गेल्या वर्षी बंगालविरुद्ध 410 धावांचा पाठलाग केला होता. पण मला कोणतीही चूक नसताना राजीनामा देण्यास सांगितलं.”, असं हनुमा विहारीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

“मी त्या खेळाडूला वैयक्तिकरित्या काहीच बोललो नाही. पण असोसिएशनला त्याचं म्हणणं पटलं. गेल्या वर्षी ज्या खेळाडूने आपलं शरीर पणाला लावलं, डाव्या हाताने फलंदाजी केली त्याच्यापेक्षा तो खेळाडू महत्त्वाचा आहे. गेल्या सात वर्षात आंध्र प्रदेश 5 वेळा बाद फेरीत पोहोचला. भारतासाठी 16 कसोटी सामने खेळलो. मला लाज वाटत होती खेळताना.. पण या पर्वात खेळण्याचं एकमेक कारण होतं ते म्हणजे माझा खेळ आणि संघाप्रती आदर..”, असं हनुमा विहारी याने पुढे सांगितलं. “दुखद बाब अशी आहे की, असोसिएशनला अस वाटतं तो जे काही सांगेल ते खेळाडूंना ऐकावं लागेल. कारण त्या खेळाडूमुळेच तिथे आहेत. मला हा अपमान आणि लाज वाटली. पण मी आजपर्यंत हे व्यक्त झालो नाही.”, असंही विहारी पुढे म्हणाला.

“मी आंध्र प्रदेशसाठी कधीही खेळणार नाही हा निर्णय घेतला आहे. जिथे मी माझा आत्मसन्मान गमावला. माझं संघावर प्रेम आहे. गेल्या काही हंगामात आम्ही जी कामगिरी केली त्याचा आनंद आहे. पण असोसिएशनला आम्ही पुढे जाणं आवडलेलं दिसत नाही.”, असंही हनुमा विहारीने पुढे सांगितलं.