IND vs NZ : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पंतप्रधानही फिदा, मोदी म्हणतात

| Updated on: Nov 15, 2023 | 11:22 PM

Narendra Modi on Mohammed Shami : भारताने न्यूझीलंडला पराभूत करत फायनलमध्ये कडक एन्ट्री मारली आहे. या सामन्यात मोहम्मद शमी याने सात विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर मोदींनीही शमीचं कौतुक केलं आहे.

IND vs NZ : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पंतप्रधानही फिदा, मोदी म्हणतात
Follow us on

मुंबई : भारत आणि न्यझीलंडमध्ये झालेल्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारतीय संघाने 70 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 398 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला 327 धावांवर रोखलं. या विजयासह भारतीय संघाने चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंड संघाचा डॅरेल मिचेल याने जिगरबाज 134 धावांची शतकी खेळी केली. मात्र मोहम्मद शमीने सात विकेट घेत एकट्याने किंवींना गुडघे टेकायला भाग पाडलं. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत खास करून मोहम्मद शमीचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

टीम इंडियाचे अभिनंदन! भारताने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. आजचा सेमी फायनल हा स्पेशल ठरला. मोहम्मद शमीने वन डे वर्ल्ड कपमध्ये केलेली गोलंदाजी क्रिकेटप्रेमी आणि पुढील पिढ्यांच्या लक्षात राहिल म्हणत मोदींनी शमीचं कौतुक केलं आहे.

 

भारताने या सामन्यात विजय मिळवला असून आता 19 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनल सामन्यात विजय मिळवत इतिहास रचायचा आहे. 2019 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने पराभूत करत बाहेर ढकललं होतं. भारताने आता यंदा त्या पराभवाचा वचपा काढला आहे.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (W), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज