PSL 2023 | उमर अकमल याचा तडाखा, 7 बॉलमध्ये 42 धावा

| Updated on: Mar 05, 2023 | 11:16 PM

उमर अकमल याने सनसनाटी खेळी केली. उमरने अवघ्या 14 बॉलमध्ये नाबाद 43 धावा केल्या.

PSL 2023 | उमर अकमल याचा तडाखा, 7 बॉलमध्ये 42 धावा
Follow us on

इस्लामाबाद | पाकिस्तान सुपल लीग क्रिकेट उमर अकमल याचं वादळ पाहायला मिळालं. इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात उमर अकमलने तडाखेदार बॅटिंग केली. उमरने इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांना धु धु धुतला. उमरने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती नाबाद खेळी केली. उमरने 14 बॉलमध्ये 43 धावा केल्या. या खेळीत उमरने 5 खणखणीत सिक्स आणि 2 चौकार ठोकले. याचाच अर्थ उमरने 7 बॉलमध्ये 42 धावा ठोकल्या. उमरच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून उमर व्यतिरिक्त मोहम्मद नवाज याने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. नजीबु्ल्लाह याने 59 रन्सचं योगदान दिलं. या तिकडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर क्वेटा ग्लॅडिएटर्स निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. त्यामुळे इस्लामाबाद युनायटेडला 180 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.

उमर अकमलची झंझावाती खेळी

इस्लामाबाद युनायटेडकडून फजलहक फारुकी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. फजलहक याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 25 धावा देत 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याखालोखाल फहीम अश्रफ याने 2 तर रईस याने 1 विकेट घेतली.

इस्लामाबाद युनायटेड प्लेइंग इलेव्हन | शादाब खान (कर्णधार) रहमानउल्ला गुरबाज, अॅलेक्स हेल्स, कॉलिन मुनरो, आझम खान (विकेटकीपर), आसिफ अली, फहीम अश्रफ, मुबासिर खान, हसन अली, रुम्मान रईस आणि फजलहक फारुकी.

क्वेटा ग्लॅडिएटर्स प्लेइंग इलेव्हन | सरफराज अहमद (कॅप्टन आणि विकेटकीपर), यासिर खान, विल स्मीद, इफ्तिखार अहमद, नजीबुल्ला जद्रान, उमर अकमल, मोहम्मद नवाज, ओडियन स्मिथ, उम्मेद आसिफ, नसीम शाह आणि नवीन उल हक.