मुंबई : पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेत क्वेटा ग्लाडिएटर्स आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पेशावर झल्मीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्वेटा ग्लॅडिएटर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात पाच गडी गमवून 206 धावा केल्या. तर बाबर आझम कर्णधारपद भूषवित असलेल्या पेशावर झल्मी संघाला 6 गडी बाद 190 धावा करता आल्या. या सामन्यात पेशावरला झल्मी संघाला 16 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सईम अयुब आणि बाबर आझम या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी केली. पण 9 षटकाच्या चौथ्या चेंडूवर माशी शिंकली आणि उतरती कळा सुरु झाली. एका चुकीच्या कॉलमुळे सईम अयुबला विकेट सोडावी लागली. 26 चेंडूत 42 धावांची वादळी खेळी तिथेच संपुष्टात आली. सईमने 26 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या होत्या.
सईम अयुबने ऑफ साइडला शॉट मारला आणि तात्काळ धाव घेतली. एक धाव पूर्णही झाली. क्षेत्ररक्षकानेही नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकल्याने दुसरी धाव घेणं तसं शक्यच नव्हतं. पण गोलंदाजाकडून चेंडू सुटल्याचं पाहू बाबरने दुसऱ्या धावेसाठी कॉल घेतला. कर्णधाराचं आदेश मानून अयुबने धाव घेतली. फिल्डरने विकेटकीपरकडे थ्रो केला. पण अयुब काही तिथे पोहोचला नाही आणि विकेट गमवून बसला. यामुळे अयुब नाराज दिसला.
Indecision in the middle and Saim is short of his crease ❌#HBLPSL9 | #KhulKeKhel | #QGvPZ pic.twitter.com/jF7pDqXMBi
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 18, 2024
बाबर आझमने 68 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही खेळाडू चांगली खेळी करू शकला नाही. विजयी धावांचा गॅप वाढत असताना मधल्या फळीचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. बाबर-सईमच्या जोडीने आणखी काही काल मैदानात काढला असता तर सामन्यातील विजय काही अंशी शक्य झाला असता.
क्वेटा ग्लॅडिएटर्स : जेसन रॉय, सउद शकील, रीली रोस्सो (कर्णधार), शेरफेन रुथरफोर्ड, ख्वाजा नॅफे, मुहम्मद वसिम, सरफराज अहमद, अकील होसेन, मुहम्मद हसनैन,मोहम्मद अमीर, अब्रार अहमद
पेशावर झल्मी : सईम अयुब, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरीस, टॉम कोल्हेर कॅडमोरे, रोवमॅन पॉवेल, डॅन मॉसले, असिफ अली, आमिर जमाल, लुक वूड, मोहम्मद झीशान, सलमान इरशाद