मुंबई : क्रिकेटमध्ये आता फिल्डिंगचा स्तर उंचावताना दिसत आहे. फिल्डिंगमुळे काही सामने फिरलेले आपण पाहिले आहेत. डोळ्यांवर विश्वात बसत नाही असे काही कॅच खेळाडू घेतात. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सीमारेषेवर अप्रतिम कॅच पाकिस्तान संघाच्या खेळाडूने घेतला आहे. सिक्सरच जाईल असं वाटत होतं मात्र खेळाडूने प्रसंगावधान राखत अत्यंत शिताफीने कॅच घेतला आहे. जरी त्याच्या नावावर कागदी विकेट नसेल जाणार तरीसुद्धा त्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे.
पाहा व्हिडीओ-
Catch hai, catch hai! ?
Excellent work by @RealHa55an! #SabSitarayHumaray l #HBLPSL8 I #IUvKK pic.twitter.com/gUFCcHnogu
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2023
हा सामना पाकिस्तान सुपर लीगमधी असून इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्ज या संघांमध्ये सुरू होता. 19 व्या ओव्हरमध्ये इरफान खानने स्ट्राईकवर असलेल्या टॉम करनला स्लो बॉल टाकला. टॉमने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. सिक्स जाणार असं सर्वांना वाटलं होतं मात्र सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या हसन अलीने कमालच केली.
सीमारेषेवर त्याने कॅच घेतला आणि त्याचा तोल जावू लागल्याने त्याने बॉल तिथे उभा असलेल्या खेळाडूकडे फेकला. व्हॅन डर ड्युसेनने सहज हा कॅच घेतला. या कॅचमुळे टॉम करनला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यामध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाने विजय मिळवला.
दरम्यान, कराची किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा डोंगर उभारल होता. कर्णधार इमाद वसिम याने 54 चेंडूत नाबाद 92 धावा करत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला होता. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इस्लामाबाद युनायटेड संघाकडून आझम खान या 24 वर्षीय खेळाडूने 41 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर इस्लामाबाद संघाने 19.2 चेंडूतच हे आव्हान पूर्ण केलं. आझम खान सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.