आयपीएल इतिहासात पंजाब किंग्स हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतरचा दुसरा कमनशिबी संघ आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असून 17 पर्वात एकदाची जेतेपद मिळवता आलं नाही. एकदा अंतिम फेरी गाठण्यात यश आलं होतं मात्र जेतेपद काही मिळवता आलं नाही. मात्र 2025 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने संघ बांधणीसाठी कंबर कसली. दिल्लीने रिकी पाँटिंगला सोडून दिल्यानंतर त्याच्यासाठी पंजाब किंग्सने पायघड्या घातल्या. इतकंच काय तर रिटेन्शनमध्ये फक्त दोन अनकॅप्ड खेळाडू ठेवून बाकीच्यांना रिलीज केलं. त्यामुळे पंजाबकडे लिलावात सर्वाधिक 11.05 कोटींची रक्कम होती. पंजाब इतक्या मोठ्या रकमेचा फायदा घेणार हे सर्वश्रूत होतं. पण मोठी रक्कम कोणासाठी मोजणार याकडे लक्ष लागून होतं. पंजाब किंग्सने अपेक्षेप्रमाणे गतविजेत्या श्रेयस अय्यरवर डाव लावला. दिल्ली आणि पंजाब किंग्समध्ये त्याच्यासाठी चढाओढ सुरु होती. पण पंजाबने 26.75 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. आता हा निर्णय फायद्याचं की तोट्याचा हे येणाऱ्या काळात कळेल. पण पंजाबने सध्यातरी योग्य ठिकाणी डाव लावला आहे, असंच म्हणावं लागेल. कारण श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे.
श्रेयस अय्यर मागच्या सहा सामन्यात मुंबईसाठी जबरदस्त खेळला आहे. रणजी ट्रॉफीनंतर त्याची बॅट सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही चांगली तळपली आहे. मागच्या सहा सामन्यात त्याची खेळी पाहून श्रेयस अय्यरचा फॉर्म परतल्याचं दिसत आहे. श्रेयस अय्यरने रणजीत 190 चेंडूत 142, 228 चेंडूत 233 आणि 46 चेंडूत 47 धावा ठोकल्या. तर सैयद मुश्ताक अली स्पर्धेत 57 चेंडूत नाबाद 130, 39 चेंडूत 71 आणि 18 चेंडूत 32 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे पंजाबला अपेक्षित फॉर्मात असलेला कर्णधार मिळाला आहे.
रिटेन खेळाडू : शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह.
नवे खेळाडू : अर्शदीप सिंह, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन.