लेकाची ऐतिहासिक कामगिरी, आई भावूक! पूर्णिमा शर्मा यांची सोशल माीडिया पोस्ट व्हायरल

| Updated on: Jul 01, 2024 | 9:01 PM

Rohit Sharma Team India: टीम इंडियाच्या 17 वर्षांनंतरच्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर सारेच भारतीय भावूक झालेत.

लेकाची ऐतिहासिक कामगिरी, आई भावूक! पूर्णिमा शर्मा यांची सोशल माीडिया पोस्ट व्हायरल
Follow us on

साऱ्या भारतात टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर अजूनही जल्लोष सुरु आहे. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. टीम इंडियाने 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप तर 2013 नंतर आयसीसी ट्ऱॉफी जिंकली. टीम इंडियाच्या खेळाडूंचं या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक खेळाडूंसह फोनद्वारे संवाद साधला आणि त्यांचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही टीम इंडियाच्या विश्व विजायाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कॅप्टन रोहित शर्माची आई पूर्णिमा शर्मा यांच्या नावाने असलेल्या खात्यावरुन इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे.

पूर्णिमा शर्मा या नावाने असलेल्या इंस्टा अकाउंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत विराट कोहली, रोहित शर्मा आणि त्याच्या खांद्यावर त्याची लेक पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोत विराटच्या हातात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी आणि खांद्यावर तिरंगा आहे. तर रोहितच्या गळ्यात वर्ल्ड कप मेडल आहे. पूर्णिमा शर्मा यांनी या फोटोला “खांद्यावर लेक, बाजूला भाऊ आणि पाठीशी देश”, असं कॅप्शन दिलं आहे. पूर्णिमा शर्मा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

दरम्यान या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी20i क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. विराट-रोहित दोघांनी निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. चाहते या धक्क्यातून सावरत नाहीत, तोवर ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी20i क्रिकेटला अलविदा केलं.

व्हायरल इंस्टा पोस्ट


टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी अशी होती टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.