हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा (27 जानेवारी) खेळ सुरु आहे. या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडने केलेल्या 246 धावांच्या प्रत्युतरात 436 धावा करुन 190 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झटके देत सामन्यावरची पकड कायम ठेवली.
टीम इंडियाचा अनुभवी आर अश्विन याने या दरम्यान इंग्लंडचे 12 वाजवले. अश्विन याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला क्लिन बोल्ड केलं. बेन स्टोक्स याने 33 बॉलमध्ये 6 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला. तसेच अश्विनने बेन स्टोक्सला आऊट करत त्याचे 12 वाजवले. अश्विनने स्टोक्सला कसोटी क्रिकेटमध्ये आऊट करण्याची ही 12 वी वेळ ठरली.
बेन स्टोक्स याने अश्विन विरुद्ध 19.3 च्या सरासरीने 624 बॉलमध्ये 232 धावा केल्या आहेत. तर अश्विनने स्टोक्सला 12 वेळा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्टोक्सने इंग्लंडसाठी पहिल्या डावात निर्णायक भूमिका बजावली. बेन स्टोक्स याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 200 पेक्षा अधिक धावा करण्यात यश आलं. बेन स्टोक्स याने 88 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांची निर्णायक खेळी केली.
बेन स्टोक्स क्लिन बोल्ड
📽️ R Ashwin to Ben Stokes
What a delivery 🙌#TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sxBGnhmhl0
— BCCI (@BCCI) January 27, 2024
दरम्यान इंग्लंडने टी ब्रेकनंतर आघाडी घेतली आहे. इंग्लंडने 190 धावांचा टप्पा पार करताच आघाडी घेतली. आता टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडच्या उर्वरित 5 विकेट्स किती धावांच्या मोबदल्यात घेतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.