राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या सामन्यात भक्कम स्थितीत आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावातील 126 धावा आणि यशस्वी जयस्वाल याच्या शतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 322 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर कुलदीप यादव आणि शुबमन गिल या जोडीने चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या दरम्यान टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आर अश्विन चौथ्या दिवशी टीम इंडियात परतणार असल्याची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
आर अश्विन याने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तडकाफडकी माघार घेतली होती. आर अश्विन कौटुंबिक कारणांमुळे सामना सोडून परतल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्यामुळे आर अश्विन तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी टीममध्ये देवदत्त पडीक्कल याचा सब्स्टीट्यूड खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र आता आर अश्विन परतरणार असल्याने टीम इंडियाला बॅटिंगसह बॉलिंगमध्येही चांगला फायदा होणार आहे.
आर अश्विन चौथ्या दिवशी परतण्यासाठी सज्ज
🚨 UPDATE 🚨: R Ashwin set to rejoin #TeamIndia from Day 4 of the 3rd India-England Test.#INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/rU4Bskzqig
— BCCI (@BCCI) February 18, 2024
दरम्यान आर अश्विनला पहिल्या डावात इंग्लंड विरुद्ध एकच विकेट घेण्यात यश आलं. मात्र अश्विनने या विकेट्ससह इतिहास रचला. अश्विनने या एकमेव विकेटसह कसोटीतील 500 शिकार पूर्ण केले. अश्विनने झॅक क्रॉली याला आपला 500 वा शिकार केला. अश्विन टीम इंडियाकडून वेगवान 500 विकेट्स घेणारा पहिला, तर एकूण दुसरा गोलंदाज ठरला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.