दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनचा या प्रसंगी झाला होता अपमान? क्रीडाप्रेमीही झाले होते नाराज

| Updated on: Dec 19, 2024 | 4:30 PM

आर अश्विन भारतात परतल्यानंतर त्याच्या वडिलांचं वक्तव्य लक्षवेधक ठरलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. अश्विनच्या वडिलांना मुलाचा अपमान झाल्याचा घणाघाती आरोप केला आहे. त्यामुळे अश्विनचा टीम इंडियात कधी अपमान झाला होता याची चर्चा रंगली आहे.

दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनचा या प्रसंगी झाला होता अपमान? क्रीडाप्रेमीही झाले होते नाराज
Follow us on

दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनच्या निवृत्तीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन सामने शिल्लक असताना निवृत्तीचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. असं प्रश्नांचं वादळ घोंगावत असताना आर अश्विन मायदेशी परतला आहे. अश्विन मायदेशी परताच त्याच्या वडिलांचं विधान चर्चेत आलं आहे. आर अश्विनच्या वडिलांनी मुलाचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. त्याचा अपमान झाल्यानेच त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं अश्विनच्या वडिलांनी सांगितलं. त्यामुळे भारतीय संघात आर अश्विनचा कधी कधी अपमान झाला ही चर्चा रंगली आहे. आर अश्विन मधेच दौरा सोडून गेल्याने टीम इंडियाचं नुकसान होईल असाही एक मतप्रवाह आहे. पण अपमानास्पद वागणुकीत किती काळ काढायचा हा देखील प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत.

प्लेइंग इलेव्हनमधून आत-बाहेर

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी आर अश्विन ऑस्ट्रेलियात जाण्याच्या तयारीत नव्हता अशी चर्चा रंगली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असेल तरच जाणार असं त्याने स्पष्ट केलं होतं. पण तिथे गेल्यावर अश्विनच्या पदरी निराशा पडली. पर्थमध्ये पहिल्या कसोटीतच अश्विनला प्लेइंग 11 मधून डावललं. त्यानंतर डे नाईट कसोटीत अश्विनला संधी मिळाली. त्यानंतर गाब्बा कसोटीत प्लेइंग 11 मधून डावललं. त्यामुळे आर अश्विनचा अपमान झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेऊनही अंतिम फेरीत डावललं

आर अश्विनला यापूर्वीही अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत आर अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्याने 13 सामन्यात 61 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. असं असूनही लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही.

इंग्लंड दौऱ्यातही आर अश्विनला बेंचवर बसवलं होतं

भारतीय संघ 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत फिरकीपटू आर अश्विनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गौतम गंभीर याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याने भारत 8 कसोटी सामने खेळला. त्यापैकी तीन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही.