मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यातील सामन्यामध्ये एक सुपर कॅच पाहायला मिळाला आहे. भारताची खेळाडू राधा यादव हिने सामन्यामध्ये घेतलेला झेल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या 5 सेकंदामध्ये तिने एक अप्रतिम झेल घेतलाय. दिल्लीने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरिअर्स संघाची सुरूवात खराब झाली. याच सामन्यात राधा यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 11व्या षटकामध्ये यूपीची दीप्ती शर्म स्ट्राईकला होती. तर दिल्ली संघाकडून शिखा पांडे ओव्हर टाकत होती. शिखा पांडेच्या चेंडूवर तिने कडक शॉट मारला पण सीमारेषेवर तैनात असलेल्या राधा यादवने चपळाई दाखवत समोर पूर्ण डाइव्ह टाकत चेंडू पकडला.
What a catch…..????#WPL2023 #radhayadav #CricketTwitter #DelhiCapitals pic.twitter.com/V7gkYiiWnq
— Smriti Sharma (@SmritiSharma_) March 7, 2023
कोणालाही विश्वास बसला नाही पण राधाने घेतलेल्या कॅचची क्रीडा वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. अवघ्या 5 सेकंदामध्ये सर्व काही घडलं. भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानानेही कॅचचा व्हिडीओ ट्विट करत राधाचं कौतुक केलं आहे. दीप्तीच्या रूपाने 71 धावांवर यूपीला चौथा धक्का बसला होता.
दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यामधील सामन्यात यूपी संघाचा पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या 212 धावांचा पाठलाग करताना यूपी संघाला निर्धारित 20 षटकात 169 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाने 42 धावांनी विजय मिळवत यूपी वॉरिअर्स संघाचा पराभव केलाय. कर्णधार मेग लॅनिंगने आक्रमक अर्धशतक आणि जेस जोनासेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्लीने सामना खिशात घातला.
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मरिझेन काप्प, जेमिमा रॉड्रिग्स, एलिस कॅपसे, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नोर्रिस
युपी वॉरियर्स : अलीसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहिला मॅकग्राथ, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्सलस्टोन, शबनिम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी