ENG vs AFG | Rahmanullah Gurbaz शतक हुकल्याने भडकला, थेट बॅटच…

| Updated on: Oct 15, 2023 | 5:22 PM

Rahmanullah Gurbaz Angry After Run Out | रहमानुल्लाह गुरुबाज याला सहावं शतक करण्याची संधी होती. मात्र रहमानुल्लाहचं नशिबच फुटकं, रहमान 80 धावांवर रन आऊट झाला. शतक हुकल्याने रहमानुल्लाह चांगलाच संतापला.

ENG vs AFG | Rahmanullah Gurbaz शतक हुकल्याने भडकला, थेट बॅटच...
Follow us on

नवी दिल्ली | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड विरुद्ध जोरदार सुरुवात केली. इंग्लंडने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. अफगाणिस्तानने या संधींचा चांगला फायदा घेतला. रहमानुल्लाह गुरुबाज आणि इब्राहीम झद्रान या दोघांनी टीमला दमदार सुरुवात करुन दिली. रहमानुल्लाह याने या भागीदारीदरम्यान त्याचे वैयक्तिक अर्धशतक केलं. रहमानुल्लाह याने शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. मात्र आदिल रशीद याने ही सेट जोडी फोडली. रशिदने इब्राहीम झद्रान 28 धावांवर कॅच आऊट झाला. इब्राहीम आणि रहमानुल्लाह या जोडीने 114 धावांची शतकी भागीदारी केली.

इब्राहीमनंतर रहमत शाह मैदानात आला. मात्र तो फक्त 8 बॉलचा पाहुणा ठरला. रहमत 3 धावा करुन आऊट झाला. जॉस बटलर याने आदिल रशिद याच्या बॉलिंगवर रहमतला स्टंपिंग केलं. त्यामुळे अफगाणिस्तानची स्थितीत 18.4 ओव्हरमध्ये 2 बाद 122 अशी झाली. चांगल्या पार्टनरशीपनंतर झटपट 2 विकेट्स गेल्याने अफगाणिस्तान बॅकफुटवर गेली. मात्र तोवर रहमानुल्लाह 80 धावांवर सेट असल्याने अफगाणिस्तानला चिंता नव्हती. रहमत शाहनंतर कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी मैदानात आला.

आदिल राशिद याने 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉल टाकला. हशमतुल्लाहने फटका मारला आणि सिंगलसाठी धावला. मात्र हशमतुल्लाह आणि रहमानुल्लाह या दोघांमध्ये तालमेल नव्हता. हशमतुल्लाह सिंगलसाठी धावत सुटला पण रहमानुल्लाह तयार नव्हता. मात्र हशमतुल्लाहने स्ट्राईक एंड सोडल्याने रहमानुल्लाहला नाईलाजाने क्रीझ सोडलं. पण रहमानुल्लाहचं नशिब खोटं.

हशमतुल्लाह याने मारलेला बॉल सब्टीट्युड डेव्हिड व्हिली याच्या दिशेने गेला. डेव्हिड व्हिली याने अचूक थ्रो केला.विकेटकीपर जॉस बटलर याने थ्रो अचूक टिपला आणि रनआऊट केलं. रहमानुल्लाह शतक हुकल्याने संतापला. मैदानातच त्याने बॅट आपटल्याची एक्शन केली मात्र रागाला आवर घातला. रहमानुल्लाहने 57 बॉलमध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या.

रहमानुल्लाह डगआऊटच्या दिशेने निघााला. बाउंड्री लाईनजवळ पोहचला. रहमानुल्लाहने त्यानंतर बॅट बाउंड्री लाईनवर आपटली. इतकंच नाही, तर रहमानुल्लाहने खुर्चीवर बॅट आपटत आपला राग व्यक्त केला. रहमानुल्लाह याच्या या कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

रहमानुल्लाह संतापला


इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.