RR vs LSG | राजस्थान रॉयल्सचे लखनऊला 194 धावांचे आव्हान, संजू सॅमसनची अर्धशतकी खेळी

| Updated on: Mar 24, 2024 | 6:17 PM

IPL 2024 : आयपीएलमधील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सुरू आहे. पहिल्याच सामन्यात राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन याने लखनऊच्या गोलंदाजांचा घाम काढला. के. एल. राहुलचा संघ दिलेल्या लक्षाचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतो की नाही पाहावं लागणार आहे.

RR vs LSG | राजस्थान रॉयल्सचे लखनऊला 194 धावांचे आव्हान, संजू सॅमसनची अर्धशतकी खेळी
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील डबल हेडर सामन्यामधील राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील पहिला सामना सुरू आहे. समानसिंग स्टेडियमवर हा सामना सुरू असून राजस्थान रॉयल्स लखनऊ सुपर जायंट्सला 194 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅप्टन संजू सॅमसन याने 53 चेंडूत (३ चौकार आणि ६ षटकार) नाबाद 82 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर रियाने पराग यानेही अवघ्या 29 चेंडूत 43 धावा करत मिडल ऑर्डरमध्ये महत्वाची खेळी केली. तर लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

राजस्थान रॉयल्सची संघाची सुरूवात एकदम खराब झाली. जोस बटलर आज अपयशी ठरला, नवीन उल हक याने त्याला 11 धावांवर माघारी पाठवलं. यशस्वी आणि संजू सॅमसनने यांनी चांगली भागीदारी केलेली मात्र मोहसीन खानने ही जोडी फोडली. जयस्वालला 24 धावांवर त्याने आऊट केलं. त्यानंतर आलेल्या रियान परागच्या साथीने संजूने मोठी भागादीरी केली. या दोघांच्या भागीदारीने राजस्थानने मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल केली.

रियान परागला नवीन उल हकने ४३ धावांवर आऊट केलं. रियान गेल्यावर आलेल्या शिमरॉन हेटमायरला बिश्नोईने आपल्या गुगलीवर माघारी धाडलं. झटपट दोन विकेट गेल्याने राजस्थानचा डाव गडबडला होता. मात्र कॅप्टन संजूची झुंज एका बाजूने सुरू होती. त्याला युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने साथ दिली. संजूने 53 चेंडूत नाबाद 82 धावा तर जुरेलनेही 12 चेंडूत 20 धावा करत संघाची धावसंख्या 190 च्य पार नेली. अखेर 20 ओव्हरमध्ये 193-4 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): के.एल. राहुल (C), क्विंटन डी कॉक (W), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल