आयपीएलच्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. केकेआर प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या 3 जागांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. इथून एकाही चूकीमुळे प्लेऑफची सर्व गणित फिस्कटू शकतात. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे एका टीमला मोठा झटका लागला आहे.
रविवारी 12 मे रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. चेन्नईने हा सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. तर राजस्थानच्या पराभवामुळे त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. या पराभवामुळे राजस्थान एका विजयाच्या प्रतिक्षेत आहे. अशात राजस्थानसाठी वाईट बातमी समोर आली आहे. राजस्थानचा आक्रमक फलंदाज उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसणार. त्यामुळे टीमचं टेन्शन वाढलं आहे.
राजस्थानचा रॉयल्सचा विस्फोटक ओपनर जॉस बटलर याने टीमला मोठा धक्का दिला आहे. बटलर उर्वरित सामने खेळणार नाहीय. राजस्थान रॉयल्स फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बटलरने माघार घेतली आहे. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत जॉस बटलर कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.
राजस्थानने शेअर केलेल्या व्हीडिओत जॉस बटलर टीमची साथ सोडत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसतोय. जॉसने आपल्या सहकाऱ्यांची गळाभेट घेतली आणि राजस्थानने आयपीएल ट्रॉफी जिंकावी, अशा प्रार्थना केली. ‘जॉस भाई की बहुत याद आयेगी’, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे. जॉस व्यतिरिक्त मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि रीस टॉपली हे इंग्लंडचे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळत आहेत. हे खेळाडूही या आठवड्यापर्यंत मायदेशी परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर संघांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
जॉस बटलरचा राजस्थानला अलविदा
We’ll miss you, Jos bhai! 🥺💗 pic.twitter.com/gnnbFgA0o8
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 13, 2024
दरम्यान जॉस बटलर याने 17 व्या हंगामात राजस्थानसाठी अफलातून कामगिरी केली. बटलरने 11 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 359 धावाही केल्या होत्या. मात्र ऐनवेळेस बटलरने माघार घेतल्याने राजस्थानची अडचण वाढली आहे. त्यामुळे आता बटलरच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागणार आहे.