रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध ओडीशा यांच्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतीली बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत करण्यात आलं आहे. सामन्यातील पहिला दिवस मुंबईच्या नावावर राहिला. मुंबईने 90 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 382 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईला पहिल्याच दिवशी 380 पार पोहचता आलं. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी सर्वाधिक नाबाद धावा केल्या. तर अंगीकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनीही योगदान दिलं. मात्र कॅप्टन अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. रहाणेला ओडीशाविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर याने सिद्धेश लाड ही जोडी नाबाद परतली.
ओडीशाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या सलामी जोडीला चांगली सुरुवात करता आली नाही. ओडीशाच्या सूर्यकांत प्रधान याने मुंबईला पहिला झटका दिला. सूर्यकांतने आयुष म्हात्रे याला 18 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर अंगीकृष रघुवंशी आणि सिद्धेष लाड या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 135 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर बिप्लब सामंतरे याने ही जोडी फोडली. बिप्लब याने अंगीकृषला आऊट केलं. अंगीकृष नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. अंगीकृषने 124 बॉलमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 92 रन्स केल्या. अंगीकृष आऊट झाल्यानंतर दुसर्याच बॉलवर मुंबईला मोठा झटका लागला. कॅप्टन अंजिक्य रहाणे पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.
सलग 2 विकेट्स गमावल्याने मुंबईची 3 बाद 154 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यर या दोघांनी मुंबईचा डाव सावरत मोठी भागीदारी रचली. हे दोघेही दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 231 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. श्रेयस अय्यरने 164 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 18 फोरच्या मदतीने नॉट आऊट 152 रन्स केल्या आहेत. तर सिद्धेश लाड हा 234 चेंडूत 14 चौकारांसह 116 धावांवर नाबाद आहे.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, हिमांशू वीर सिंग, शम्स मुलानी आणि रॉयस्टन डायस.
ओडिशा प्लेइंग इलेव्हन : गोविंदा पोद्दार (कॅप्टन), अनुराग सारंगी, स्वस्तिक सामल, संदीप पट्टनायक, बिप्लब सामंतरे, कार्तिक बिस्वाल, आसीरवाद स्वेन (विकेटकीपर), देबब्रत प्रधान, सूर्यकांत प्रधान, हर्षित राठोड आणि सुनील राऊल.