Ranji Trophy Final | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, विदर्भासमोर विजयासाठी विशाल आव्हान

| Updated on: Mar 12, 2024 | 5:45 PM

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final 3rd Day Highlights | सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुशीर खान याने विदर्भ विरुद्ध दुसऱ्या डावात जबरदस्त शतक ठोकलं. तर श्रेयस अय्यर याने 95 धावांची खेळी केली.

Ranji Trophy Final | तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, विदर्भासमोर विजयासाठी विशाल आव्हान
Follow us on

मुंबई | मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीसाठी अतिंम सामना खेळवण्यात येत आहे.  या सामन्यात मुंबई क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भासमोर विजयासाठी तिसऱ्या दिवशी 538 धावांचं अवघड आव्हान दिलं आहे. विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 2 ओव्हरमध्ये 10 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला विजयासाठी आणखी 528 धावांची गरज आहे. अथर्व तायडे आणि ध्रुव शोरे ही सलामी जोडी अनुक्रमे नाबाद 3 आणि 7 धावा केल्या. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

विदर्भाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात शार्दूल ठाकुरच्या 75 धावांच्या जोरावर ऑलआऊट 224 धावा केल्या. त्यानंतर मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर विदर्भाचा पहिला डाव हा 105 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली. मुंबईने दुसऱ्या डावात 130.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 418 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं विशाल आव्हान मिळालंय. विदर्भाने या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता  10 धावा केल्या आहेत. आता विदर्भाकडे या विशाल धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 दिवसांचा अवधी आहे. तर मुंबईला रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी  10 विकेट्सची गरज आहे.

मुंबई टीमचा दुसरा डाव

मुंबईकडून दुसऱ्या डावात मुशीर खान याने शतकी खेळी केली. तर कॅप्टन अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शम्स मुलानी त्रिकुटाने अर्धशतकी खेळी केली. मुशीर खान याने 136 धावांची शतकी खेळी केली. तर श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि शम्स मुलानी या तिघांनी अनुक्रमे 95, 73 आणि 50* धावा केल्या. तर विदर्भाकडून हर्ष दुबे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या चौथ्या दिवसाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.