मुंबई | अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफी फायनलच्या दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियममध्ये विदर्भाला 105 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली आहे. विदर्भाने पहिल्या दिवसअखेर मुंबईच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात 3 विकेट्स गमावून 31 धावा केल्या. विदर्भ दिवसअखेर 193 धावांनी पिछाडीवर होती. त्यानंतर अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भाचे उर्वरित 7 विकेट्स 73 धावांच्या मोबदल्यात घेत 105 रन्सवर ऑलआऊट केलं.
विदर्भकडून यश राठोड याने सर्वाधिक 27 धावा केल्या. तर ओपनर अथर्व तायडे याने 23 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर या व्यतिरिक्त इतरांना 20 पेक्षा मजल मारता आली नाही. आदित्य ठाकरे याने 19, यश ठाकुर याने 16, अमन मोखाडे 8, कॅप्टन अक्षय वाडकर 5, उमेश यादव 2 आणि हरीष दुबे याने 1 धाव केली. तर आदित्य सरवटे झिरोवर नाबाद परतला. मुंबईच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी कमाल केली. तनुष कोटीयन, शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी या त्रिकुटाने धमाका केला. या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर याने एकमेव पण विकेट घेत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली.
दरम्यान मुंबईने पहिल्या डावात 224 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवाणी या दोघांनी 81 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुंबईने धडाधड विकेट्स गमावल्या. मात्र शार्दूल ठाकुर मुंबईसाठी पुन्हा एकदा तारणहार ठरला. शार्दूलने मुंबईकडून सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. शार्दुलने केलेल्या खेळीमुळे मुंबईला 200 पार मजल मारता आली. मुंबईकडून शार्दुल व्यतिरिक्त पृथ्वी शॉ याने 46, भूपेन ललवाणी याने 37, शम्स मुलानी 13 आणि तुषार देशपांडे याने 14 धावा केल्या. तर विदर्भकडून हर्ष दुबे आणि यश ठाकुर या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. उमेश यादवने 2 विकेट्स मिळवल्या. तर आदित्य ठाकरेने 1 विकेट घेतली.
मुंबईकडून विदर्भाचा करेक्ट कार्यक्रम
Innings Break!
Mumbai have bowled Vidarbha out for 105 in the 1st innings, taking a lead of 119 runs.
3⃣ wickets each for Dhawal Kulkarni, Shams Mulani & Tanush Kotian
1⃣ wicket for Shardul Thakur@IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVIDScorecard ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/OeswFfXSoV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.