MUM vs VID | बॅटिंगनंतर मुंबईचं जोरदार कमबॅक, दिवसअखेर विदर्भ 193 धावांनी पिछाडीवर

| Updated on: Mar 10, 2024 | 6:25 PM

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final Day 1 Highlights | मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनलमधील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. पहिल्या दिवशी शार्दूल ठाकुरने बॉलिंग-बॅटिंगसह अष्टपैलू कामगिरी केली.

MUM vs VID | बॅटिंगनंतर मुंबईचं जोरदार कमबॅक, दिवसअखेर विदर्भ 193 धावांनी पिछाडीवर
Follow us on

मुंबई | मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी फायनल सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. विदर्भाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 13 ओव्हरमध्ये 31 धावा केल्या. विदर्भ अजूनही 193 धावांची पिछाडीवर आहे. अर्थव तायडे 21 आणि आदित्य ठाकरे नाबाद 0 परतले. त्याआधी मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईने बॉलिंगने शानदार कामगिरी करत विदर्भाच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

विदर्भाची बॅटिंग

मुंबईला ऑलआऊट करुन बॅटिंगसाठी आलेल्या विदर्भाला शार्दूल ठाकुरने पहिलाच झटका दिला. शार्दूलने ध्रुव शौरे याला झिरोवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर धवल कुलकर्णी याने विदर्भाला दणका दिला. विदर्भाने 4 धावांमध्ये 2 विकेट्स गमावल्या. धवलने अमन मोखाडे याला 8 आणि करुन नायर याला झिरोवर आऊट केलं. आता दुसऱ्या दिवशीही मुंबईच्या गोलंदाजांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान त्याआधी विदर्भाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगची संधी दिली. मुंबईची आश्वासक सुरुवात झाली. पृथ्वी शॉ आणि भुपने ललवाणी या दोघांनी 81 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनी मुंबईच्या खडूस बॅटिंगला सुरंग लावला. भुपेन 46 आणि पृथ्वी 37 धावांवर आऊट झाले. त्यानंतर मुशीर खान 6 धावा करुन मैदानाबाहेर गेला. श्रेयस अय्यरने पुन्हा निराशा केली. श्रेयसला 7 धावा करता आल्या. हार्दिक तामोरेने 5 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 7 धावा केल्या. शम्स मुलानी 13 धावा करुन मैदानाबाहेर गेला.

त्यानंतर एकट्या शार्दूल ठाकुर याने मुंबईची जबाबदारी खांद्यावर घेत सहकाऱ्यांच्या मदतीने डाव सावरला. शार्दुलने तनुष कोटीयन याच्यासह आठव्या विकेटसाठी 22 तर तुषार देशपांडेसह नवव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने या दरम्यान 12 वं अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलने केलेल्या या खेळीमुळे मुंबईला 200 पार मजल मारली. तनुष कोटीयन याने 8 आणि तुषार देशपांडे याने 14 धावा केल्या. तर शार्दूल आऊट झाला आणि मुंबईचा डाव आटोपला. शार्दुलने 3 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. उमेश यादव याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आदित्य ठाकरे याच्या खात्यात 1 विकेट गेली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला


मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.