MUM vs ODI : मुंबईचा डाव आणि 103 धावांनी धमाकेदार विजय, शम्स मुलानीसमोर ओडीशाने गुडघे टेकले

| Updated on: Nov 09, 2024 | 1:10 PM

Ranji Trophy Mumbai vs Odisha Match Result : मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात ओडीशाविरुद्ध 1 डाव आणि 103 धावांनी विजय मिळवला आहे. शम्स मुलानी याने 11 विकेट्स घेतल्या.

MUM vs ODI : मुंबईचा डाव आणि 103 धावांनी धमाकेदार विजय, शम्स मुलानीसमोर ओडीशाने गुडघे टेकले
shams mulani mumbai ranji trophy
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई टीमने रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत ओडीशावर धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने ओडीशावर एक डाव आणि 103 धावांच्या फरकांनी मात केली आहे. श्रेयस अय्यर याचं द्विशतक आणि सिद्धेश लाड याच्या नाबाद 169 धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 600 पार मजल मारली. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने पहिला डाव हा 123.5 ओव्हरमध्ये 4 बाज 602 धावांवर घोषित केला. मुंबईच्या गोलंदाजांनी ओडीशा पहिल्या डावात 285 धावावंर गुंडाळून फॉलोऑन दिलं. मात्र ओडीशाला दुसऱ्या डावातही काही खास करता आलं नाही. ओडीशाला दुसऱ्या डावात 214 धावांवर गुंडाळून मुंबईने विजय मिळवला. शम्स मुलानी याने मुंबईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. शम्स मुलानी याने दोन्ही डावात 5 विकेट्स घेतल्या शम्सने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या.

ओडीशा दोन्ही डावात शम्ससमोर ढेर

ओडीशाने पहिल्या डावात 94.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट285 रन्स केल्या. ओडीशाकडून संदीप पटनाईक याने 102 धावांची खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ओडीशाचे टॉप 5 मधील 3 फलंदाज हे झिरोवर आऊट झाले. स्वास्तिक समल, गोविंदा पोद्दार आणि बिप्लब सामंतरे हे तिघे आले तसेच गेले. ओपनर अनुराग सांरगी याने 39 धावा केल्या. कार्तिक बिस्वल 22, देबब्रत प्रधान 45, आसीरवाद स्वेन 37 आणि हर्षित राठोड याने 23 धावांचं योगदान दिलं. तर दोघांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. मुंबईकडून शम्स मुलानी याने 6 विकेट्स घेतल्या. हिमांशु सिंह याने तिघांना बाद केलं. तर शार्दूल ठाकुरने 1 विकेट घेतली. ओडीशाचा अशाप्रकारे पहिला डाव 285 धावांवर आटोपल्याने मुंबईने फॉलोऑन देत पुन्हा बॅटिंगसाठी भाग पाडलं.

ओडीशाचा दुसरा डाव

ओडीशाचा दुसरा डाव हा 72.5 ओव्हरमध्ये 214 धावांवर आटोपला. भारताने यासह डाव आणि 103 धावांनी विजय मिळवला. ओडीशाकडून दुसऱ्या डावात आसिरवाद स्वेन याने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही मुंबईच्या गोलंदाजांनी 45 पेक्षा अधिक धावांची खेळी करू दिली नाही. मुंबईकडून दुसऱ्या डावात शम्सने 5 आणि हिमांशु सिंह याने 4 विकेट्स मिळवल्या. तर रॉयस्टन डायसने एक विकेट घेत चांगली साथ दिली.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी ओडीशाने नाणफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडलं. मुंबईने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. मुंबईने 19 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मुंबईने 154 धावांवर सलग 2 विकेट्स गमावल्या. अंगकृष रघुवंशी 92 आणि अजिंक्य रहाणे झिरोवर आऊट झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी 354 रन्सची पार्टनरशीप केली. हर्षित राठोड याने ही जोडी फोडली. श्रेयस अय्यर 228 बॉलमध्ये 24 फोर आणि 6 सिक्ससह 233 रन्स केल्या. तर सिद्धेश लाड आणि सूर्यांश शेंडगे या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यानंतर कॅप्टन अजिंक्य रहाणेने डाव घोषित केला. सिद्धेशने 337 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने नाबाद 169 धावा केल्या. तर सूर्यांश शेडगे 36 बॉलमध्ये 79 रन्स केल्या. ओडीशाकडून बिप्लब सामंतरे याने 2 विकेट्स घेतल्या. तर सूर्यकांत प्रधान आणि हर्षित राठोड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, हिमांशू वीर सिंग, शम्स मुलानी आणि रॉयस्टन डायस.

ओडिशा प्लेइंग इलेव्हन : गोविंदा पोद्दार (कॅप्टन), अनुराग सारंगी, स्वस्तिक सामल, संदीप पट्टनायक, बिप्लब सामंतरे, कार्तिक बिस्वाल, आसीरवाद स्वेन (विकेटकीपर), देबब्रत प्रधान, सूर्यकांत प्रधान, हर्षित राठोड आणि सुनील राऊल.