मुंबई | टीम इंडियाचा क्रिकेटर सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याने टीमसाठी निर्णायक खेळी करत अर्धशतक ठोकलं आहे. मुशीरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये मुंबईकडून खेळताना बडोदा विरुद्ध अर्धशतक झळकावलं. मुशीरच्या अर्धशतकी खेळीमध्ये 3 चौकारांचा समावेश होता. मुशीरने या अर्धशतकासह मुंबईचा डाव सावरला. मुशीरकडून आता मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांना शतकाची अपेक्षा आहे.
कॅप्टन अजिंक्य रहाणे याने मुंबईतील बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमीत आयोजित केलेल्या या सामन्यात टॉस जिंकला. अजिंक्यने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र मुंबईची आश्वासक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर बडोद्याने ठराविक अंतराने झटके देत मुंबईला बॅकफुटवर ढकललं. मात्र मुशीरच्या अर्धशतकामुळे मुंबईला संजीवनी मिळाली.
पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवाणी या सलामी जोडीने 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पृथ्वी 46 बॉलमध्ये 33 धावा करुन आऊट झाला. पृथ्वीनंतर ललवाणी आऊट झाला. ललवाणीने 19 धावा केल्या. अजिंक्य रहाणे मैदानात आला. कॅप्टन म्हणून रहाणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र रहाणे अपयशी ठरला. रहाणेने 3 धावाकरुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर शम्स मुलानी यानेही निराशा केली. शम्सने 6 धावा केल्या.
शम्स मुलानी हा आऊट झाल्याने मुंबईचा स्कोअर 4 आऊट 99 असा झाला. मात्र त्यानंतर मुशीर खान आणि सुर्यांश शेडगे या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. मुशीर खान याने या दरम्यान आपलं अर्धशतक झळकावलं. मुशीर खानने निर्णायक क्षणी झुंजार खेळी करत हे अर्धशतक पूर्ण केलं. आता क्रिकेट चाहत्यांना मुशीर खानकडून अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्याची प्रतिक्षा आहे.
बडोदा प्लेईंग ईलेव्हन | विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.