मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर टी 20 मालिका पार पडणार आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या गोटात दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय.
टीम इंडियाचा तारणहार असलेला चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी महारेकॉर्ड केला आहे. त्यामुळे कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.
पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पुजाराने 12 हजार धावा ठोकत महारेकॉर्ड केला आहे. पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांनाही असं करणं जमलं नाही. पुजाराआधी वसीम जाफरने असा कारनामा केला आहे. जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 हजार 609 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफीत आंधप्रदेश विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने ही भव्यदिव्य कामगिरी केली. पुजाराने या सामन्यात 91 धावा केल्या. पुजाराने 240 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 18 हजार 422 धावा केल्या आहेत. यामध्ये 56 शतकं आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्यामुळे आता पुजाराकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर ऑस्ट्रेलियाने संपूर्ण मालिकेसाठी टीम निवडली आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद