IPL 2023 : तेवढं मन मोठं लागतं, राशिद खान याच्या एका कृतीनं जिंकली भारतीयांची मनं!

| Updated on: May 06, 2023 | 12:14 AM

विराट आणि गंभीर मैदानात एकमेकांच्या अंगावर कसे धावून गेले हे आपण पाहिलं. मात्र आज एका परदेश खेळाडूच्या कृतीने सर्वांची मन जिंकली आहेत. हा परदेशी खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून करामती खान म्हणून प्रसिद्ध असलेला राशिद खान आहे.

IPL 2023 : तेवढं मन मोठं लागतं, राशिद खान याच्या एका कृतीनं जिंकली भारतीयांची मनं!
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील राडा सर्वांनी पाहिला. जगातील प्रसिद्ध असलेल्या या लीगला गालबोट लागलंच त्यासोबतच क्रिकेटच्या प्रतिमेलाही डाग लागला. विराट आणि गंभीर मैदानात एकमेकांच्या अंगावर कसे धावून गेले हे आपण पाहिलं. मात्र आज एका परदेशी खेळाडूच्या कृतीने सर्वांची मन जिंकली आहेत. हा परदेशी खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून करामती खान म्हणून प्रसिद्ध असलेला राशिद खान आहे. राशिदने नेमकं असं काय केलं ज्याचा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

गुजरात टायटन्स संघाच्या बॅटरने मारलेला सिक्सर एका कॅमेरामनला लागला. त्यानंतर सीमारेषेवर असलेल्या राशिद खान याने त्या कॅमेरामनजवळ जावून त्याची चौकशी केली. तसं पाहायला गेलं तर त्याने काही मोठं केलं नाही. पण विराट आणि गंभीर यांनी जे केलं त्यापेक्षा जास्त पटीने योग्य होतं. खेळाडू अनेक विक्रम रचू शकतो पण हे गुण जे असतात ते एखाद्या नेटमध्ये कितीही प्रॅक्टिस केली तरी घेता येऊ शकत नाही.

पाहा व्हिडीओ- 

 

राशिद खाने आजच्या सामन्यामध्ये तीन विकेट्स घेत विकेट्स घेत राजस्थान संघाचं कंबरडं मोडलं. आपल्या स्पेलमध्ये राशिदने 14 धावा दिल्या. गुजरातसाठी हा प्लेअर एकदम मॅचविनर झाला आहे. बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डिंग या सगळ्यामध्ये पठ्ठ्या आपलं 100 टक्के देताना दिसतो. संघाला जशी गरज तसं तो करिष्मा करतो आणि संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावतो.

 

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (c), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल