आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांना सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. अफगाणिस्तानला फक्त सामना जिंकायचा आहे, यासह ते क्वालिफाय करतील. तर बांगलादेशला नेट रनरेटच्या हिशोबाने सामना जिंकावा लागणार आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी 116 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशला हे आव्हान नेट रनरेटच्या हिशोबाने 12.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे. बांगलादेशने 13 ओव्हरनंतर हे आव्हान पूर्ण केलं, तर त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे एका जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. अशात सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंगदरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान आपल्या सहकाऱ्यावर संतापलेला दिसून आला.
सहकाऱ्याने दुसरी धाव घेण्यास नकार दिल्याने राशिदने रागारागात भर मैदानात बॅट फेकली आणि संताप व्यक्त केला. राशिदच्या या कृतीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार अफगाणिस्तानच्या डावातील शेवटच्या अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये घडला. स्ट्राईकवर असलेल्या राशिदने 1 धाव पूर्ण केल्यांनतर दुसऱ्या धावेसाठी जवळपास अर्ध्या वाटेत पोहचला होता. मात्र त्याच्यासोबत असलेल्या करीम जनात याने नकार दिला आणि राशिदला माघारी जायला भाग पाडलं. व्हीडिओ निट पाहिला तर राशिदने दुसरी धाव पूर्ण केली असती. मात्र तसं न झाल्याने राशिदने राग जाहीर केला आणि त्याने स्ट्राईक एंडच्या दिशेने बॅट फेकली. त्यानंतर करीमने राशिदला बॅट आणून दिली.
दरम्यान अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 115 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी ओनपर गुरबाज आणि इब्राहीम झद्रान या सलामी जोडीने 10.4 ओव्हरमध्ये 59 धावांची भागीदारी केली. मात्र पहिली विकेट जाताच अफगाणिस्तान बॅकफुटवर गेली आणि ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानसाठी गुरबाजने सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. तर इब्राहीद झद्रानने 18 आणि अझमतुल्लाह झझईने 10 धावा केल्या. तर कॅप्टन राशिदने अखेरच्या क्षणी 3 सिक्सह नाबाद 19 धावांची खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला 100 पार मजल मारता आली. बांगलादेशकडून रिशाद हौसेन याने 3 विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजूर या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
राशिदचा संताप, बॅट फेकली
Is this the funniest moment of the tournament from Rashid Khan?#T20WorldCup #AFGvBAN #BANvAFGpic.twitter.com/Feaa0iWPs0
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) June 25, 2024
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, तौहिद ह्रदोय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.