रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याच्या एका शतकाने टीम इंडिया आणि इंग्लंडचा बाजार उठला

| Updated on: Nov 01, 2023 | 7:43 PM

New Zealand vs South Africa | दक्षिण आफ्रिका टीमने वनडे वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका टीमने इंग्लंड आमइ टीम इंडियाचा बाजार उठवला आहे. नक्की काय झालंय ते जाणून घेऊयात.

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याच्या एका शतकाने टीम इंडिया आणि इंग्लंडचा बाजार उठला
Follow us on

पुणे | दक्षिण आफ्रिका टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आपला धमाका कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडसमोर 358 धावांचं आव्हान ठेवलं आहे. क्विंटन डी कॉक-रॅसी व्हॅन डेर ड्युसेन जोडीचं शतक आणि डेव्हिड मिलर याने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकाने 357 पर्यंत मजल मारली. क्विंटन डी कॉक याचं वर्ल्ड कपमधील चौथं आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याचं दुसरं शतक ठरलं. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याने शतक ठोकत टीम इंडिया आणि इंग्लंडचा बाजार उठवला आहे.

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याचं शतक होताच दक्षिण आफ्रिका आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक शतक करणारी टीम ठरली. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याचं शतक हे या वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकाकडून आठवं शतक ठरलंय. दक्षिण आफ्रिका टीमने यासह मोठ्या विक्रमाची बरोबरीही केलीय. दक्षिण आफ्रिकाने श्रीलंकाच्या विक्रमाची बरोबरी केलीय. श्रीलंका टीमच्या फलंदाजांनी 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 8 शतकं झळकावली होती.

टीम इंडिया आणि इंग्लंडचा बाजार उठला

दरम्यान रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याच्या शतकासह दक्षिण आफ्रिकाने टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या फलंदाजांनी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 7-7 शतकं झळकावली होती. तसेच दक्षिण आफ्रिकाकडून आणखी एक शतक आल्यास श्रीलंका टीमचा वर्ल्ड कपमधील वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक होईल. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील आपला पुढील सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे.

क्विंटन डी कॉकच्या नावावर सर्वाधिक शतकं

दरम्यान क्विंटन डी कॉक याने दक्षिण आफ्रिकासाठी या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं केली आहेत. डी कॉक याने 8 पैकी 4 शतकं केली आहेत. तर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याचं हे दुसरं शतक ठरलंय. तर एडन मारक्रम आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 शतक ठोकलंय.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.