मुंबई : भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारताने कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत उत्तम प्रदर्शन करत विंडिजचा पराभव केला आहे. आता खऱ्या अर्थाने भारतासमोर विंडिजविरोधात T20 मालिकेचं कठीण आव्हान असेल. विंडिज संघाचा सध्या डाउन फॉल सुरु असला तरी T20 मध्ये ते भारतीय संघाला चांगलीच लढत देऊ शकतात. या मालिकेसाठी विंडिजचे अनेक दबंग खेळाडू संघात परत आलेत. यामधील स्फोटक खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, हेटमायर, शाई होपसारखे तगडे खेळाडू आहेत. मात्र भारताने हुकमी एक्क्याप्रमाणे असलेल्या खेळाडूला या मालिकेत संधी दिली आहे.
हा युवा खेळाडू असला तरी त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आशिया कपमध्ये आऊट केलं होतं. जास्तीत जास्त संधी न मिळाल्याने हा खेळाडू चर्चेत आला नाही. मात्र ज्या-ज्या वेळी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. आज विंडिजला रोखण्यासाठी हा खेळाडू महत्त्वाचा ठरणार आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून रवी बिश्नोई आहे.
टीम इंडियात विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याचं जवळपास 1 वर्षांनी पुनरागमन झालंय. रवीने अखेरचा टी 20 सामना 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. आजच्या सामन्यामध्ये रवी बिश्नोई एक्स फॅक्टर ठरू शकतो.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक
पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.