सैफ अली खानची एक्स पत्नी होती या क्रिकेटरची गर्लफ्रेंड, कोण आहे तो खेळाडू?

| Updated on: Aug 09, 2024 | 3:59 PM

सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अमृता सिंह ही एका मोठ्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला डेट करत होती. कोण आहेत ते क्रिकेटर ज्यांच्यासोबत अमृता सिंह रिलेशनशीपमध्ये होती. जाणून घ्या.

सैफ अली खानची एक्स पत्नी होती या क्रिकेटरची गर्लफ्रेंड, कोण आहे तो खेळाडू?
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमृता सिंह हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहे. अमृता सिंहने सैफ अली खान याच्यासोबत लग्न केले. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांना दोन मुले देखील आहेत. मात्र, सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अमृता सिंह ही एका मोठ्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला डेट करत होती. विशेष म्हणजे हे क्रिकेटर दुसरे तिसरे कोणीही नसून रवी शास्त्री हे होते.  एका मुलाखतीमध्ये अमृता सिंह हिच्याबद्दल बोलताना रवी शास्त्री हे दिसली होती. आता त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अमृता सिंह आणि रवी शास्त्री यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. दोघांनी एक फोटोशूट देखील केले होते. रवी शास्त्री म्हणताना दिसत आहेत की, ज्यावेळी मी माझ्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मुलाखत घेणारा होस्ट म्हणाला की, कोण गर्लफ्रेंड?  यावर रवी शास्त्री हे म्हणाले की, अमृता राव…होस्टने परत एकदा विचारले की, अमृता सिंह? यावर रवी शास्त्री हे म्हणाले की, तेच नाव चित्रपटवाली..बघितला असेल तुम्ही चित्रपट? पुढे रवी शास्त्री हे म्हणतात की, ज्यावेळी मी माझ्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदा भेटलो, त्यावेळी मी पहिल्या दहा मिनिटांमध्ये एक शब्दही बोललो नव्हतो. मला माहिती होते की, मी मुलींना पाहून जास्त लाजतो. इतके पण जास्त नाही की, दहा मिनिटांमध्ये मला एकही शब्द बोलण्याची संधी मिळून नये.

पाहा व्हिडीओ:-

 

मला दहा मिनिटांमध्ये एकही संधी बोलण्याची मिळाली नाही. फक्त तीच बोलत होती. रवी शास्त्री यांचा हा व्हिडीओ जुना आहे. परंतू, या व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. मुळात म्हणजे अमृता सिंह आणि रवी शास्त्री यांच्या रिलेशनची इतकी जास्त चर्चा होती की, दोघे लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. मात्र, अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

अमृता सिंह हिने रवी शास्त्री यांच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर सैफ अली खान याच्यासोबत डेट करण्यास सुरूवात केली. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांच्या वयामध्ये मोठे अंतर होते. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी लग्न केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अमृता सिंहसोबतच्या घटस्फोटानंतर सैफ अली खान याने बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबत लग्न केले.