मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालंय. त्यानुसार, एकूण 13 सामने होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांकडे संयुक्तरित्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. पाकिस्तानमध्ये 4 आणि श्रीलंकेत 9 सामने पार पडणार आहेत. आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या तिघांनी आशिया कपसाठी टीम जाहीर केली आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि हेड कोच रवी शास्त्री यांनी आशिया कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे. रवी शास्त्री यांनी आपल्या टीममध्ये शुबमन गिल, ईशान किशन आणि रोहित शर्मा या तिघांना ओपनर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. रवी शास्त्री यांनी तसेच मीडल ऑर्डरची जबाबदारी विराट कोहली, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर सोपवली आहे. तसेच या टीममध्ये हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा या तिघांची ऑलराउंडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या तिघांवर बॅटिंगसह बॉलिंगची दुहेरी जबाबदारी आहे.
रवी शास्त्री यांनी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडीवर विश्वास दाखवला आहे. तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर वेगवान गोलंदाजाची धुरा आहे.
रवी शास्त्री यांनी टीममध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांना टीममध्ये स्थान दिलेलं नाही. केएल आणि श्रेयस हे दोघेही दुखापतीतून सावरत आहेत.
एशिया कपसाठी शास्त्रीय यांची टीममध्ये कोण?
Experts, including Ravi Shastri, Sandeep Patil and MSK Prasad, have predicted their India squad for Asia Cup 2023 🏏#AsiaCup2023 #RohitSharma #TeamIndia #CricketTwitter pic.twitter.com/NOHDwORTtv
— InsideSport (@InsideSportIND) August 16, 2023
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.