IPL 2023 : RR vs PBKS | सोप्पा वाटला का आश्विनचा कॅरम बॉल, हतबल बॅट्समनने टेकले गुडघे, पाहा व्हिडीओ

| Updated on: Apr 05, 2023 | 10:45 PM

राजस्थानच्या गोलंदाजांना फक्त चार विकेट घेता आल्या. यातील जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या तर आश्विन आणि चहलने 1 विकेट घेतली. आश्विनने घेतलेली विकेट पाहण्यासारखी होती.

IPL 2023 : RR vs PBKS | सोप्पा वाटला का आश्विनचा कॅरम बॉल, हतबल बॅट्समनने टेकले गुडघे, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये पंजाबने 197 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानच्या गोलंदाजांना फक्त चार विकेट घेता आल्या. यातील जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या तर आश्विन आणि चहलने 1 विकेट घेतली. आश्विनने घेतलेली विकेट पाहण्यासारखी असून बॅट्समन हतबल झाला आणि त्याने आपली विकेट गमावली आहे.

पाहा व्हिडीओ-

युझवेंद्र चहलने जितेश शर्मा याला आऊट केल्यावर मैदानात सिंकदर रझा आला होता. 16 व्या ओव्हरमध्ये जितेश चौथ्या चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर आश्विन बॉलिंगसाठी आला होता आणि रझा स्ट्राईकवर होता. आश्विनने पहिलाच कॅरम बॉल टाकला आणि रझा पूर्णपणे हतबल झाला कारण बॉल थेट स्टंपवर जाऊन बसला.

नॉन स्ट्राईक एंडला उभ्या असलेल्या शिखर धवनने लवकर क्रिस सोडलं. मग काय मंकडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या आर. अश्विन गोलंदाजी करताना थांबला. मग आता आपला बळी जातो की काय अशा अविर्भावात शिखर धवन चाचपडला. क्रिसमध्ये परतण्यासाठी धडपड करू लागला. पण आर. अश्विनने तशी काही विकेट घेतली नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (W), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग