मुंबई : वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना 191 धावांवर ऑल आऊट झाला. पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा ढासळला, अवघ्या 36 धावांमध्ये 8 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा याची 80 धावांची तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने सात विकेटने विजय मिळवला. पाकिस्तानला पराभूत करणं मोठी गोष्ट होती, सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. सगळ्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या यामधील सर जडेजाने घेतलेल्या दोन विकेटने मोठा विक्रम रचला गेला आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जडेजाने दोन विकेट घेतल्या होत्या. या दोन विकेटसह त्याने वन डे मध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. वन डे मध्ये अशी कामगिरी करणारा ते पहिला डावखुरा गोलंदाज ठरला आहे. झहीर खान याला त्याने मागे टाकलं आहे. झहीरने वन डे क्रिकेटमध्ये 94 विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्ड कपमधील हायव्होल्टेज सामना सर्वांना वाटलं रोमहर्षक होईल मात्र तसं काही झालं नाही. रोहित शर्मा अँड कंपनीने मात्र पाकिस्तान संघाची डाळ काही शिजू दिली नाही. सर्व गोलंदाजांनी कडक गोलंदाजी केली. त्यानंतर रोहितने तर वन साईड सामना मारला.
दरम्यान, भारताने या विजयासह वर्ल्ड कपमधील आपला तिसरा विजय मिळवला. या विजयासह भारताने आपलं वर्ल्ड कपमधील वर्चस्व कायम ठेवलं, भारताने पाकिस्तान संघाला आठवेळा पराभूत केलं आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.