नवी दिल्ली : जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) इंग्लंडच्या भूमीवर जोरदार कामगिरी दाखवत मोठा विक्रम केलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघ 416 धावांत संपुष्टात आला (IND vs ENG) ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) शतक झळकावलं. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनं 16 चेंडूत नाबाद 31 धावा करत धावसंख्या 400 धावांच्या पुढे नेली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं 35 धावा दिल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलं असून हा विश्वविक्रम झालाय. बुमराहनं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी ब्रायन लारानं 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्ध एका षटकात 28 धावा दिल्या होत्या. तर 2013 मध्ये जॉर्ज बेलीनेही जेम्स अँडरसनच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये केशव महाराजनं जो रूटच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. दरम्यान, बुमराहनं या सर्वांचे विक्रम तोडत मोठी कामगिरी केली आहे. बुमराहचे फॅन्स देखील खूश झाले आहेत. सध्या बुमराहची जोरदार चर्चा आहे.
35 runs in an over!
World record.
And that too by Jasprit Bumrah off Stuart Broad.
Boom boom? ? pic.twitter.com/ED96xJzxSu— Harsh Goenka (@hvgoenka) July 2, 2022
हे सुद्धा वाचा
आज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका षटकात 30 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या. जसप्रीत बुमराहनं 84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने पुन्हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू नोबॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने ब्रॉडवर सलग 3 चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. ब्रॉडने ओव्हरमध्ये एकूण 8 चेंडू टाकले. बुमराह प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे.
BOOM BOOM BUMRAH IS ON FIRE WITH THE BAT ??
3️⃣5️⃣ runs came from that Broad over ?? The most expensive over in the history of Test cricket ?
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) – https://t.co/tsfQJW6cGi#ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/Hm1M2O8wM1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 2, 2022
जसप्रीत बुमराह 31 धावांवर नाबाद राहिला. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध नाबाद 34 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. तो त्याच्या कारकिर्दीतील 30वी कसोटी खेळत आहे आणि त्याने केवळ 2 वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारले होते.