नवी दिल्ली : रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक (Century) झळकावलंय. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे. त्यानं हा पराक्रम इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत (IND vs ENG) 183 चेंडूत केला. 98 धावांत 5 विकेट गमावल्यानंतर भारतीय संघानं आम्ही ही बातमी लिहत असताना 82 षटकांत 9 गडी गमावून 375 धावा केल्या होत्या. जडेजा 104 धावा करून जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराह 0 धावा करून खेळत आहे. याआधी ऋषभ पंतनेही 146 धावा केल्या होत्या. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता 2 शतकांच्या जोरावर या सामन्यातही संघाने आगेकूच केली आहे.
Third Test ton for Ravindra Jadeja ?#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/MxCN2n9Drp
— ICC (@ICC) July 2, 2022
हे सुद्धा वाचा
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघानं 7 बाद 338 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं धावसंख्या 371 पर्यंत नेली. दोघांनी 48 दिल्या. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे. दरम्यान, जडेजानं 13 चौकारांच्या मदतीनं आपले शतक पूर्ण केले. याआधी मार्चमध्ये त्यानं मोहालीत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. 194 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला.
All class from Ravindra Jadeja ?#WTC23 | #ENGvIND | ? Scorecard: https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/3RQWF9ReQO
— ICC (@ICC) July 2, 2022
33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे. यापूर्वी त्यानं घरच्या मैदानावर दोन्ही शतकं झळकावली होती. या सामन्यापूर्वी एजबॅस्टन येथे भारताकडून फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी शतक झळकावले होते. पण पंत आणि जडेजा या दोघांनीही या सामन्यात शतके झळकावून इतिहास रचला आहे. पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
भारतीय डावाबद्दल बोलायचे झालं तर रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. हुनमा विहारीनं 20 आणि शुभमन गिलने 17 धावा केल्या. विराट कोहली 11 आणि चेतेश्वर पुजारा 13 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरनं 15 धावांचे योगदान दिलं.